G20 Summit News esakal
देश

G20 Summit : 'जी२०'च्या प्रतिनिधींनी श्रीनगरमध्ये घेतला शिकारा सवारीचा आनंद

सकाळ डिजिटल टीम

G-20 Summit News : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथे सोमवारी मोठ्या बंदोबस्तामध्ये जी २० शिखर संमेलनाला सुरुवात झाली. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी तब्बल २५ देशांचे प्रतिनिधी भारतात दाखल झाले आहेत.

आज काही प्रतिनिधींनी श्रीनगरच्या डल सरोवरामध्ये शिकारा सवारीचा आनंद घेतला. २०१९ मध्ये जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यानंतर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे.

या शिकारा राईडचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ही मनमोहक दृष्य श्रीनगरच्या डल सरोवरातील आहेत. अशा प्रकारे विविध देशांच्या प्रतिनिधींनी शिकारा सवारीचा आनंद घेतला.

श्रीनगरमधील Dal या मंत्रमुग्ध करणाऱ्या तलावातील सूर्यास्त पाहणं म्हणजे मौजच असते. हे दृष्य एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं तेथील लोक मानतात. येथून सूर्योदय आणि सूर्यास्ताची छबी सुंदर दिसते.

G-20 च्या बैठकीत ६० हून अधिक व्यक्ती सहभागी झाले आहेत. सुरक्षेच्या दुष्टीने सर्व काळजी घेण्यात आली आहे. एनएसजीची विशेष टीम येथे तैनात करण्यात आली आहेत. नौसेनेचे कमांडो समुद्र मार्गांवर आपला तळ ठोकून आहेत. तसेच संपूर्ण शहरात देखील प्रत्येक रस्त्यावर सुरक्षारक्षक तैनात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT