g20 summit 
देश

G20 Summit: PM मोदींनी केली G20 शिखर परिषदेच्या समाप्तीची घोषणा; ब्राझीलकडे सोपवलं अध्यक्षपद

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - G20 Summit 2023 : G20 शिखर परिषद दिल्लीत आज संपन्न झाली. 9 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय G20 शिखर परिषदेचा समारोप घोषित करताना, PM मोदींनी G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलच्या राष्ट्रपतींना सुपूर्द केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, नोव्हेंबरपर्यंत G20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस आम्ही G20 चे दुसरे व्हर्च्युअल सत्र आयोजित करण्याचा माझा प्रस्ताव आहे. यामध्ये या शिखर परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेता येईल.

त्याचवेळी, ब्राझीलचे राष्ट्रपती म्हणाले की, G20 परिषदेचे कार्यक्षमतेने नेतृत्व केल्याबद्दल आणि या शिखर परिषदेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदी आज ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांच्याशीही पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करतील.

याशिवाय पंतप्रधान मोदी आज भारताचे महत्त्वाचे भागीदार देश UAE आणि दक्षिण कोरिया यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पंतप्रधान जी-20 चे महत्त्वाचे सदस्य असलेल्या युरोपियन युनियनच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT