rape case  file photo
देश

बर्थडे पार्टीतच सामूहिक बलात्कार, मुलीच्या मृत्यूनंतर TMC नेत्याला अटक

पश्चिम बंगालच्या नादीया जिल्हयातील घटना

सकाळ डिजिटल टीम

बंगालच्या नादीया जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या मुलीवर वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार करण्यात आला, यात तिचा मृत्यू झाला असून, धमकावून तिचं अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणात टिएमसीच्या नेत्याला अटक करण्यात आलीय, ब्रजगोपाल उर्फ सोहेल गयली असं त्या स्थानिक नेत्याचं नाव आहे. पीडीत मुलगी या नेत्याच्या बर्थडे पार्टीत गेली होती. ( Gangrape on minor in birthday party TMC leader held)

तृणमूल कॉंग्रेसच्या पंचायत सदस्य असलेल्या ब्रजगोपाल याला पोलिसांनी अटक केलीय. पीडीतेच्या कुटुंबियांनी ब्रजगोपालवर संशय व्यक्त केला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला रनघर कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. हंसखली पोलिस स्टेशनला याविषयीची तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक रुपांकर सेनगुप्ता यांनी दिलीय. पार्टीतून आल्यानंतर मुलीला रक्तस्त्राव आणि प्रचंड वेदना होत होत्या, तिला दवाखान्यात घेऊन जाण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहीती पीडीतेच्या आईने सांगितलं.

या घटनेनंतर भाजपाने 'हंसखली' येथे १२ तासांचा बंद पुकारलाय. यासंदर्भात TMC च्या नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री शशी पंजा यांनी राज्य सरकारकडून अल्पवयीनांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारातील प्रकरणावर कोणाची हयगय केली जाणार नसल्याचं म्हणाल्या. या प्रकरणाचं राजकारण केलं जाऊ नये, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT