NARENDRA MODI GANGA ARATI ESAKAL
देश

Modi Ganga Aarti: हिंदूकरण नव्हे... मोदी ग्लोबल नेत्यांना का करायला लावतात गंगेची आरती? स्वतःच सांगितलं कारण

PM Modi: यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जी-20 दरम्यान जगातील सुमारे एक लाख लोक भारतात आले होते. जगातील महत्त्वाच्या देशांच्या निर्णय प्रक्रियेत हे लोक महत्त्वाचे होते.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचा अर्ज भरण्यासाठी देशातील तब्बल 12 मुख्यमंत्री उपस्थित होते.

हा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आज तक'ला या हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत वाराणसी, लोकसभा निवडणूक आणि गंगा मातेचे महत्त्व यासह अनेक विषयांवर भाष्य केले.

दरम्यान देशात एकूण सात टप्प्यामध्ये निवडणुका होणार असून यातील चार टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. आता निवडणुकांचा पाचवा टप्पा 20 मे रोजी तर शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. (PM Modi, Ganga Aarti And Global Leaders)

वेयाळी जागतिक नेते आणि गंगा पूजा या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, मी त्यांना गंगा आरती करायला लावतो म्हणजे मी त्यांचे हिंदूकरण करत नाही. मी त्यांना आरती करायला लावून आपले निसर्गावरील प्रेम आणि आपण निसर्गाला किती समर्पित आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. निसर्गाचा नाश करणारे आपण नाही. आपण निसर्गाचे रक्षण करणारे लोक आहोत. जग ग्लोबल वॉर्मिंगबद्दल चिंतित आहे पण मी त्यांना गंगा आरती करायला लावून दाखवतो की, ग्लोबल वॉर्मिंगचा उपाय निसर्गाच्या भक्तीमध्ये आहे.

दरम्यान, यावेली बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर मी व्यावसायिक किंवा आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर हा देश 140 कोटींची बाजारपेठ आहे, कोणाला गंगा स्नानाला जायचे आहे, कोणाला चारधामला जायचे आहे तर कोणाला द्वादश ज्योतिर्लिंगाला जायचे आहे. अशा परिस्थितीत मी त्यातली अर्थव्यवस्था पाहिली आहे आणि भविष्यही पाहिले आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या गोष्टींचा अभिमान बाळगता किंवा त्यांचा आदर करता तेव्हा संपूर्ण जग तुमचा आदर करते.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, त्यांनी G20 मध्ये एक प्रयोग केला होता. त्यांनी G20 ला त्यांच्यापुरते किंवा दिल्लीपुरते मर्यादित ठेवायचे नाही असे ठरवले होते. त्यांनी देशात वेगवेगळ्या ठिकाणी G20 च्या 200 बैठका घेतल्या. त्याचा परिणाम असा झाला की, G20 चे काम तर झालेच पण जागतिक नेत्यांनाही देशातील विविधतेची माहिती मिळाली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जी-20 दरम्यान जगातील सुमारे एक लाख लोक भारतात आले होते. जगातील महत्त्वाच्या देशांच्या निर्णय प्रक्रियेत हे लोक महत्त्वाचे होते. या लोकांनी संपूर्ण देश पाहिला. हा देश किती मोठा आणि विविधतेने भरलेला आहे हे त्यांना कळून चुकले. या प्रकारे मी माझ्या देशाच्या ब्रँडिंगसाठी G20 चा वापर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT