Varanasi Rain Sakal
देश

गंगा-यमुनेचे ‘यूपी’त रौद्ररुप; अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार

उत्तर प्रदेशात अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. बाराशेहून अधिक गावांमधील पाच लाख लोकांना पुराचा फटका बसला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीटीआय

लखनौ - उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) अनेक जिल्ह्यांमध्ये पुराने (Flood) हाहाकार माजवला आहे. बाराशेहून अधिक गावांमधील पाच लाख लोकांना पुराचा फटका (Loss) बसला असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदत आणि बचावासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेशात काल दिवसभरात सरासरीपेक्षा १५४ टक्के अधिक, म्हणजे १३.१ मिमी पाऊस पडला. प्रयागराज, चित्रकूट, कौसंबी, प्रतापगड, बस्ती, गोंडा, सुल्तानपूर, श्रावस्ती, लखनौ, रायबरेली आणि फतेहपूरसह ११ जिल्ह्यांमध्ये काल दिवसभरात २५ मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला.

उत्तर प्रदेश राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बदायूँ, प्रयागराज, मिर्झापूर, वाराणसी, बलिया आणि गाझीपूर या जिल्ह्यांमध्ये गंगेने पातळी ओलांडली आहे, तर औरारिया, हमीरपूर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये यमुनेने विक्राळ रुप धारण केले आहे. याशिवाय, बेटवा, शारदा आणि कुनो या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे.

या सर्व ठिकाणी मदतकार्याला वेग आला आहे. पूरग्रस्त भागांमध्ये आतापर्यंत २१ हजार रेशन किट आणि दीड लाख लाखांहून अधिक जेवणाची पाकिटे वाटण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल यांच्यासह इतर काही बचाव दलांची एकूण ५९ पथके मदतकार्य करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT