gaziyabad 
देश

शेतकरी आंदोलन मिटणार? यूपी गेटवर कलम 144'; राकेश टिकैत मागण्यांवर ठाम

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : गाझीयाबाद जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना यूपी गेटवरुन आंदोलनाचे ठिकाण रिकामं करण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. हायवे रिकामा करण्याची नोटीस मिळाल्यानंतर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलनाच्या ठिकाणावरुन हटण्यास नकार दिला आहे. यावेळी राकेश टिकैत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी म्हटलं की, काही लोक प्रशासनासोबत मिळून कट रचत आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन समाप्त होणार नाही.

गुरुवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी अजयशंकर पांडेय यांनी राकेश टिकैत आणि अन्य शेतकरी नेत्यांना नोटीस पाठवून हायवे रिकामा करण्यास सांगितले होते. यानंतर राकेश टिकैत धरणे आंदोलनाला बसले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी म्हटलं की, शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कट करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने भलेही आंदोलनाची वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडले तरी आसपासच्या गावातून त्यांच्यासाठी पाणी येईलच.

यूपी गेटवर कलम 144 लागू
यूपी गेटवर गाझीयाबाद जिल्हा प्रशासनाने कलम 144 लावले आहे. कायदा आणि सुव्यवस्था खराब होऊ नये यासाठी गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या संख्येने पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाकडून अल्टीमेटम दिल्यानंतर काही लोक तिथून जायला लागले. ट्रॅक्टरमधून जाणाऱ्या लोकांनी म्हटलं की आता आम्ही आमच्या जिल्ह्यात आंदोलन करु. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी आता कमी प्रमाणात लोक आहेत. यूपी गेटवर धरणे देणाऱ्या आंदोलकांविरोधात काही स्थानिक लोकांनी आंदोलन केले. त्यांनी खलिस्तानी गो बॅकच्या घोषणा दिल्या. त्याशिवाय देशद्रोही वाप जाओ चे देखील नारे लगावण्यात आले. या लोकांचं म्हणणं आहे की, हे लोक शेतकरी नाहीयेत. त्या लोकांनी घोषणाबाजी करत आंदोलनाचे ठिकाण रिकामं करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. 

दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे पूर्णपणे बंद 
आंदोलकांना हटवण्याच्या आदेशानंतर दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आता दिल्लीतून वाहने येऊ शकत नाहीयेत. दोन्हीकडून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT