nandan .jpg 
देश

धक्कादायक! मंदिरात पाणी प्यायला म्हणून मुस्लिम मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

दीनानाथ परब

उत्तर प्रदेशात माणुसकीला लाजवणारी एक घटना समोर आली आहे. मुस्लिम मुलगा मंदिरात पाणी प्यायला म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक माणूस मुलाला त्याचे नाव विचारताना दिसतो. मुलगा मुस्लिम असून तो मंदिरात पाणी पिण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपीला गाझियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. व्हायरल क्लिपच्या आधारावर एफआयआरही नोंदवण्यात आला आहे. 

श्रींगी नंदन यादव असे त्या माणसाचे नाव आहे. "व्हिडिओमध्ये मुलाला मारहाण करणारा आरोपी बिहार भागलपूरचा रहिवाशी आहे. एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात तपास सुरु आहे" असे गाझियाबादचे एसपी इराज राजा यांनी सांगितले. 

व्हिडिओमध्ये आरोपी मुलाला त्याचे आणि वडिलांचे नाव विचारताना दिसतो. त्याने मुलाचा हात पकडलेला असून त्या मुलाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसते. मंदिरात तू काय करायला गेला होतास, अशी विचारणा आरोपीने मुलाजवळ केली.  मुलाने पाणी पिण्यासाठी मंदिरात गेलो होतो, असे उत्तर दिल्यानंतर आरोपीने लगेचच त्याला माराहण सुरु केली. मुलाच्या कानशिलात लगावली त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded DCC Bank: अर्धापूर सेवा सोसायटी गटात पंचरंगी लढत; भाजपच्या तिघांसह पाच उमेदवार रिंगणात, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लढत

Pune Ambedkar Hostel Grant: आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; भोजन अनुदानात २१५० वरून ३२०० रुपयांपर्यंत वाढ

Junnar Civic Row: जुन्नर नगरपरिषदेतील कलह शिगेला; नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात सत्ताधारी-विरोधकांची सर्वसाधारण सभेला दांडी

Pune Zilla Panchayat Samiti Association: पुणे जिल्हा तालुका पंचायत सभापती असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर

Crime: टीसी घ्यायला आला, पण हातात होता चाकू... शिक्षकावर विद्यार्थ्याचा जीवघेणा हल्ला, भयंकर कारण समोर

SCROLL FOR NEXT