ghulam nabi azad Ghulam Nabi Azad
देश

गुलाम नबी आझाद म्हणाले, ...त्याला पाकिस्तान, दहशतवाद जबाबदार

सकाळ डिजिटल टीम

महात्मा गांधी हे सर्वांत महान हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये जे काही घडले त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे. याचा परिणाम सर्व हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लिम, डोग्रासला प्रभावित केले आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) म्हणाले.

राजकीय पक्ष धर्म, जात आणि इतर गोष्टींच्या आधारावर २४ तास विभाजन करू शकतात. मी कोणत्याही पक्षाला माफ करीत नाही. समाजात लोकांनी एकत्र राहावे. जात, धर्माचा विचार न करता सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, असही आझाद (Ghulam Nabi Azad) म्हणाले. ‘द काश्मीर फाईल्स या बॉलिवूड चित्रपटामुळे जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) काश्मिरी पंडितांच्या पलायनाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. चित्रपटावर एकापाठोपाठ एक राजकीय वक्तव्ये येत आहेत.

काश्मीरवर चित्रपट बनला आहे. परंतु, यात सत्य लपवण्यात आले आहे. काश्मीरसारख्या (Jammu and Kashmir) संवेदनशील विषयावर राजकारण करणे योग्य नाही. ‘काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा फक्त एक चित्रपट आहे. त्यात अनेक खोट्या कथा दिल्या आहेत. भाजपने या चित्रपटाचा प्रचार केला तर भाजप समर्थकांना हा चित्रपट पाहायला मिळेल. आता या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री देण्यात येणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

१५० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार

‘द काश्मीर फाईल्सच्या (The Kashmir Files) बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आलेख रॉकेटसारखा वर गेला आहे. या चित्रपटाला ‘बाहुबली-२’ सारखी लोकप्रियता मिळाली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास दीड आठवडा झाला आहे. लवकरच हा चित्रपट १५० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार आहे. चित्रपटाचे आतापर्यंत एकूण १४१ कोटी २५ लाखांचे कलेक्शन झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT