girl alleged inquiry officer asi of chandigarh police 
देश

पोलिस अधिकारी मला सारखाच म्हणतोय ये हॉटेलवर...

वृत्तसंस्था

चंदीगड (पंजाब): पोलिस अधिकारी मला हॉटेलवर बोलवत असून, ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप एका युवतीने केला आहे. युवतीने दोघांमधील संभाषणाची सीडी वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांना दिली आहे. मात्र, पोलिस अधिकारी प्रेम सिंह यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.

युवतीचा प्रियकर आकाश कुमार (वय 24) याला पोलिसांनी एका प्रकरणामध्ये अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास एका पोलिस अधिकारी प्रेम सिंह यांच्याकडे आहे. आकाशची सुटका करण्यासाठी प्रेम सिंह सतत फोन करून हॉटेलवर बोलवत असल्याची तक्रार युवतीने केली आहे.

युवतीने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, प्रेम सिंहने माझा मोबाईल क्रमांक मिळवला होता. 22 जानेवारी रोजी त्याने मला फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, भेटण्यास मी नकार दिला. यावेळी त्याने आकाशची सुटका करण्यासाठी शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाय, अनेकदा फोन करून हॉटेलवर ये म्हणून दबाव आणायचा. दोघांच्या संभाषणाची सीडी तयार करून पोलिसांकडे दिली आहे. प्रेम सिंहने माझ्या घरी येऊन सुद्धा धमकी दिली आहे.

प्रेम सिंह म्हणाले, 'आकाशच्या गुन्ह्याचा तपास माझ्याकडे आहे. युवती माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून फसवण्याचा प्रयत्न करत आहे.'

पोलिस अधिकारी चरणजीत सिंह विर्क म्हणाले, 'या प्रकरणाचा तपास नेहा यादव करत आहेत. याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तपासात काही निष्पन्न झाले तर कारवाई केली जाईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT