Rajasthan Crime News esakal
देश

Ajmer : सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला हॉटेलमध्ये बेदम मारहाण; आरोपीनं रुग्णालयात नेलं अन्..

अजमेर जिल्ह्यात एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय.

सकाळ डिजिटल टीम

अजमेर जिल्ह्यात एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय.

राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात (Ajmer Rajasthan) एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी मुलीला बेदम मारहाण केलीय. त्याचवेळी रुग्णालयात (Hospital) उपचारादरम्यान बुधवारी पीडित मुलीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपींना अटक केलीय. तर, इतरांचा शोध घेण्यासाठी छापे टाकले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील क्लॉक टॉवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इथं 28 ऑक्टोबरला पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, 27 ऑक्टोबर रोजी कुख्यात गुन्हेगार श्यामलाल डांगोरिया उर्फ ​​श्यामा यानं रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीचं अपहरण केलं आणि नंतर साथीदारांसह हॉटेलमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

त्याचवेळी मुलीच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांचा जमाव रुग्णालयासमोर जमा झाला आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली. पोलिसांनी इतर आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी लोकांनी केली. सामूहिक बलात्कार आणि मारहाणीनंतर आरोपीनं दुसऱ्या दिवशी पीडित मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेल्यानंतर तेथून पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल गाठलं.

मुलीला बेदम मारहाण करण्यात आली असून तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमेच्या खुणा आढळल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण, प्राणघातक हल्ला आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT