बुलेटस्वार मुलीचा स्टंटबाजी esakal
देश

Viral Video : बुलेटस्वार मुलीचा स्टंटबाजी; नेटकरी म्हणाले...

बुलेट बाइकबाबत तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ

सकाळ वृत्तसेवा

बुलेट बाइकबाबत तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी रात्रीच्यावेळी एकटीच बुलेट बाईक चालवताना दिसतीय. यावेळी ही मुलगी विनाहेल्मेट बुलेट बाईक चालवत असून एक हात सोडून गाडी चालवत असताना दिसून येतयं. ते पाहून सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक जण मुलीला दबंग म्हणत आहेत, त्यामुळे बुलेट बाईक चालवल्याबद्दल अनेक जण मुलीचं कौतुक करत आहेत.

बुलेट बाइकबाबत (Bullet Bike) तरुणांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. अनेक जण सोशल मीडियावर बुलेट चालवतानाचे व्हिडिओ पोस्ट करतात. मुलीही यात मागे नाहीत. बाइक चालवणाऱ्या मुलींचा इन्स्टाग्राम (Instagram) रील्सचा व्हिडिओही तुम्ही पाहिला असेल. या व्हिडिओंना भरपूर व्ह्यूजही मिळालेत. असे व्हिडिओ इंटरनेट युजर्सना खूप आवडतात आणि व्हिडिओ (Viral video) लगेच व्हायरल होतात.

या व्हिडीओमध्ये मुलीला असं हेल्मेट न घालता बुलेट चालवताना पाहून आणि एक हात सोडून जाताना पाहून काही युझर्स संतापले आहेत. व्हिडिओतील मुलीचे काही शब्द सोशल मीडिया यूजर्सना आवडलेले नाहीत. इंटरनेट युजर्स कमेंटच्या माध्यमातून या मुलीला विविध प्रकारचे सल्ले देत आहेत. काही जण एक हात सोडून गाडी चालवणं योग्य नाही असं म्हणत आहेत, तर काही लोक असं म्हणत आहेत की, एका मुलीला विनाहेल्मेट गाडी चालवल्याबद्दल दंड आकारला जावा.

व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral video) तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी जीन्स आणि जॅकेट घालून अंधाऱ्या रात्री एकटीच बुलेट घेऊन निघाली आहे. ती पूर्ण स्वॅगने बुलेट चालवत असल्याचे दिसतेय. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की हेल्मेट न घालता ती बुलेट चालवतेय. त्याचबरोबर ती एका हाताने बुलेट बाईक कंट्रोल करताना दिसत आहे. तसेच यावेळी मुलगीही हसताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये बाईकचा स्पीडही चांगला दिसतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी हसताना गार्डवर पाय ठेवत आहे, ज्यामुळे गाडीवरील तोल बिघडू शकला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT