Himachal Pradesh 
देश

Girl Marriage Age: हिमाचल सरकारचा ऐतिहासिक निर्णय! वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यावरच होणार मुलींची लग्न

या बैठकीत हिमाचलमध्ये नव्या चित्रपट धोरणाला मंजुरी देण्यात आली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

शिमला : हिमाचल प्रदेश सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार या राज्यात आता वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलींची लग्न होणार नाहीत. म्हणजेच मुलींच्या लग्नाचं किमान वय आता २१ वर्षे असणार आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मुलींच्या लग्नाचं वय १८ वर्षावरुन २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडं मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. (girl marriage year historic decision by himachal pradesh govt married age increased to 21 years)

नव्या चित्रपट धोरणाला मुंजरी

शिमल्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली. सुमारे तीन तास सुरु असलेल्या या बैठकीत हिमाचलमध्ये नव्या चित्रपट धोरणाला मंजुरी देण्यात आली. तसेच चित्रपट परिषद बनवण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

या धोरणानुसार आता हिमाचलमध्ये शुटींगसाठी तीन दिवसात परवानगी दिली जाईल. यामुळं चित्रपट निर्मात्यांना फायदा होईल. तसेच यावेळी विधवा एकल नारी योजना आणि हिमाचल प्रदेश डिजिटल पॉलिसीला देखील मंजुरी देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

शाळेत मुलांच्या नाव नोंदवण्याच्या प्रक्रियेत बदल

याशिवाय पिरियड बेस्ट गेस्ट टिचर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटनं यासाठी २६०० पदं मंजूर केले आहेत. तसेच शाळेत वयाच्या ६ व्या वर्षी मुलांचं नाव टाकण्याच्या नियमात सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कांगडामध्ये २२५ कोटींच्या मिल्क प्रोसेसिंग प्लांट देखील उभारण्यात येणार आहे. (Marathi Tajya Batmya)

मुलींच्या लग्नाचं वय आता २१ वर्षे असणार

त्याचबरोबर कॅबिनेटच्या निर्णयांपैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे मुलींच्या लग्नाचं वय आता २१ वर्षे असणार आहे. सध्या हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवण्यात येणार आहे, त्यानंतर हा निर्णय अंतिम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT