girl setting near mothers deadbody from 4 months at uttar pradesh 
देश

पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला अन् बसला धक्का...

वृत्तसंस्था

बाराबंकी (उत्तर प्रदेश): पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. पण, दरवाजा तोडल्यानंतर समोरील दृष्य पाहून धक्का बसला. एक मुलगी तिच्या आईच्या सांगाड्याला घट्ट मिठी मारून बसली होती. आईच्या मृतदेहाजवळ तब्बल चार महिने बसून राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

व्हि. के. टंडन यांच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलगी दोघीच घरी राहात होत्या. पण, गेल्या काही दिवसांपासून दोघीही कोणाला दिसल्या नव्हत्या. शेजारील नागरिकांना संशय आल्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर घराला बाहेरून कुलूप होते. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. घराचा दरवाजा तोडल्यानंतर धक्काच बसला. घरामध्ये आईच्या मृतदेहाला घट्ट पकडून मुलगी बसून होती. मृतदेहावर ब्लँकेट आणि चादर घातली होती. शिवाय, मृतदेहाचे सांगाड्यात रुपांतर झाले होते. मुलगी जागची उठायला तयार नव्हती. अखेर पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मुलीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे दिसून आले.

दरम्यान, मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT