girlfriend buried lovers body in the house at mp
girlfriend buried lovers body in the house at mp 
देश

प्रियकराच्या मृतदेहावर बसून राहिली तब्बल अडीच महिने...

वृत्तसंस्था

सिधी (मध्य प्रदेश): एका मिसकॉलमुळे दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पुढे दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेयसीने घरामध्येच खड्डा खोदून मृतदेह पुरला. मृतदेहावर तब्बल अडीच महिने ती बसून होती.

सिधी जिल्ह्यातील कमक्ष गावामध्ये ही घटना घडली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद (वय 27) याचा चुकून युवतीला मिस कॉल गेला. मिस कॉलनंतर दोघांमध्ये संभाषण झाले. संभाषण चालू राहिल्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाले. पुढे दोघे एकाच घरामध्ये राहू लागले. सहा डिसेंबर रोजी दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर प्रेयसी माहेरी गेली होती. सात डिसेंबर रोजी मोहम्मदने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. युवती घरी आल्यानंतर गळफास घेतल्याचे आढळून आले. तिने मृतदेह खाली उतरवला व कोणाला समजू नये म्हणून घरामध्येच खड्डा खोदून मृतदेह पुरला. या मृतदेहावर तब्बल दोन महिने 12 दिवस बसून होती.

दरम्यान, मोहम्मदच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान प्रेयसीने घरामध्ये मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT