Sonia-Gandhi 
देश

Coronavirus : सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या - सोनिया गांधी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे उद्योग, व्यवसाय, व्यापार सारे काही ठप्प झाले असून जवळपास बारा कोटी लोक बेरोजगार झाले असून ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सरकारने मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी (एमएसएमई) विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली सरकारकडे केली आहे.  

या क्षेत्राचे देशाच्या एकूण उत्पन्नात एक तृतीयांश एवढे योगदान असल्याचे सांगताना सोनियांनी शेतकरी, मजूर, स्थलांतरितांच्या अडचणींकडे लक्ष वेधले. तसेच रोजगार गेलेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब दरमहा किमान साडेसात हजार रुपयांची मदत सरकारने करावी, अशी मागणीही केली.

Coronavirus : एटीएममपासून सावधान; तीन जवानांना कोरोनाची लागण

संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. आज झालेल्या बैठकीत सोनिया गांधींनी वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त करताना पुरेशा प्रमाणात चाचण्या होत नसल्याची तसेच काँग्रेसच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याची नाराजीही बोलून दाखविली. कोरोनाशी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज असताना सत्ताधारी सांप्रदायिक द्वेषाचा विषाणू पसरविण्यात गुंतलेला आहे, असे त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारकडून पुरेसा निधी नाही
कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राकडून ना पुरेशी वैद्यकीय साधने मिळाली, ना जीएसटीचा निधी मिळाला, असा ठपका काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. पंजाबच्या हक्काचा 4000 कोटी रुपयांचा जीएसटी निधी अद्याप केंद्राकडून मिळालेला नाही. एक लाख संचांची मागणी असताना फक्त दहा हजार चिनी बनावटीचे चाचणी संच देण्यात आले असे ते म्हणाले.  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, केंद्राच्या पॅकेजखेरीज कोरोनाशी लढता येणार नसल्याचे स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पाच दिवसांच्या मुसळधार पावसानंतर पुणेकरांना दिलासा; वारीत भाविकांचा उत्साह, पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर कमी

ओम भूतकरने गुपचूप उरकलं लग्न, पत्नी 'या' क्षेत्रात कार्यरत, लग्नातले फोटो Viral

Latest Marathi News Live Update : हाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर भाजपच्या दोन नगरसेवकांचा कथितरीत्या हल्ला, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

IND vs ENG : ना वैभव, ना संजू... टीम इंडियाची खरी डोकेदुखी 'दोन' खेळाडूंनी वाढवली; पाचव्या सामन्यातून त्यांची हकालपट्टी निश्चित

Koyna Dam Update : महाबळेश्वर, नवजा, कोयनानगरला पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणात तब्बल 51.71 टीएमसी साठा, किती क्युसेक पाण्याची आवक सुरू?

SCROLL FOR NEXT