Budget 2023 President Draupadi Murmu esakal
देश

Electoral Bond: इलेक्टोरल बॉण्डबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्या; राष्ट्रपतींकडं विनंती अर्ज दाखल

सुप्रीम कोर्टाचं बार असोसिएशनच सुप्रीम कोर्टाच्या विरोधात गेलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोखे बेकायदा असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं नुकताच दिला. त्याचबरोबर याची माहिती सार्वजनिक करण्यासाठी मुदतवाढ मागणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची याचिकाही फेटाळून लावली. या निवडणूक रोख्यांमुळं मोठा राजकीय गोंधळ होण्याची शक्यता आहे.

यापार्श्वभूमीवर आता या निवडणूक रोख्यांच्या प्रकरणावरुन खुद्द सुप्रीम कोर्टाचं बार असोसिएशनच (SCBA) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. या बार असोसिएशननं राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र लिहून सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय रद्द करण्याची विनंती केली आहे. (give stay on supreme court order regarding electoral bond write a letter to president droupadi murmu by scba)

SCBA चे अध्यक्ष आदिश अग्रवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून म्हटलं की, राजकीय पक्ष, कॉर्पोरेट संस्था यांच्याशिवाय सर्व हितचिंतकांना न्याय मिळवून देण्याची अपिल केली आहे. पत्रात पुढे लिहिलंय की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम १४३ अंतर्गत या प्रकरणाची दखल घ्यावी. (Marathi Tajya Batmya)

सुप्रीम कोर्टानं स्वतःच असे निर्णय देता कामा नये ज्यामुळं संविधानिक अडथळे निर्माण होतील. ज्यामुळं भारतीय संसदेचा गौरव आणि त्यातील जन प्रतिनिधींची सामुहिक बुद्धिमत्ता कमजोर होईल आणि राजकीय पक्षांना आपली लोकशाही कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होईल.

एसोसिएशननं म्हटलंय की, विविध राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांची नावं उघड केल्यानं त्यांचा छळ होण्याची शंका वाढते. ही स्कीम यासाठी आणली गेली होती की, आपल्या देशात निवडणूक फंडिंगची कुठलीही प्रणाली नव्हती. (Marathi Tajya Batmya)

याचा हेतू हा होती की राजकीय पक्षांना कायदेशीर मार्गांनी निवडणूक उद्देशांचं संसाधन वाढवण्यात सक्षम करणं हे आहे. अशातच कोणतेही कॉर्पोरेट कंपनी देणगी देताना वैध आणि कायदेशीर नियमांचं पालन केलेलं असेल तर त्याला दंडही केला जाऊ शकतो. (Latest Marathi News)

निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

सुप्रीम कोर्टानं ११ मार्चला दिलेल्या आपल्या निकालात एसबीआयच्या इलेक्टोरल बॉण्डच्या मुद्द्यावर ३० जूनपर्यंतची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. ही याचिका कोर्टानं फेटाळली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायाधिशांच्या खंडपीठानं एसबीआयला १२ मार्चपर्यंत इलेक्टोरल बॉण्डशी संबंधित डिटेलला आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश दिले होते.

तसेच निवडणूक आयोगाला आपल्या अधिकृत वेबसाईटवर इलेक्टोरल बॉण्डची ही माहिती १५ मार्चच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रकाशित करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सुप्रीम कोर्टानं १५ फेब्रुवारीला आपला ऐतिहासिक निकाल देताना केंद्र सरकारच्या निवडणूक बॉण्डची योजना रद्द केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT