Goa Assembly Team eSakal
देश

Goa : आणखी एका आमदाराची मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी

Goa : धक्कादायक आरोपांमुळे गोव्याच्या राजकारणात खळबळ

सुधीर काकडे

पणजी : गोव्यातील (Goa) आगामी काळातील विधानसभा निवडणूकांच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर गोव्यात (Goa) राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे सरकारमधल्या मंत्र्यांवर अतिशय गंभीर असे आऱोप केले जात आहेत. त्यातच आता पुन्हा एका आमदाराने (MLA) मराठी अभिनेत्रीकडे (Marathi Actress) शरीर सुखाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. जागतिक तापमानवाढीशी संबंधित चळवळीच्या कार्यकर्त्या शमिता सृष्टी शर्मा यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

गोव्यातील एका आमदाराने मराठी अभिनेत्रीकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करत, मागच्या आठ महिन्यांपासून छळ केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी मुख्यमंत्री सावंत आणि आमदारावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला आहे.

अभिनेत्री असलेल्या आपल्या मैत्रिणीसोबत ही घटना घडली असून त्यावर आता कायदेशीर कारवाईची मागणी केली असल्याचं शमिता शर्मा यांनी सांगितलं. शर्मा यांच्या ट्विटनुसार, ही अभिनेत्री मूळची पुण्याची असून आमदाराने तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. लॉकडाऊन दरम्यान, सदरील आमदाराने अभिनेत्रीला त्याच्या ओळखीच्या एका निर्मात्याकडून एका मराठी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी त्याने निर्मात्याला देण्यासाठी तिच्याकडून काही बोल्ड फोटोही मागितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Tyre Air Filling Tips : गाडीच्या टायरसाठी नायट्रोजन की रेग्युलर हवा? काय आहे बेस्ट, हवा भरण्याआधी जाणून घ्या कुठे वाचतात जास्त पैसे

Vidarbha: कारची दुचाकीला धडक; उपसरपंच आगाशे यांचा मृत्यू; रामटेक-गोंदिया महामार्गावरील घटना; तणावाचे वातावरण

Latest Marathi Update Live: पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणात पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये २२ जणांचा मृत्यू

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

SCROLL FOR NEXT