देश

मोन्सेरात यांच्यामुळे पडलं होतं मनोहर पर्रीकर यांचं सरकार

सकाळ डिजिटल टीम

भाजपने पणजीतून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पर्रीकरांच्या मुलाला डावलून मोन्सेरात यांना उमेदवारी दिलीय.

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भाजपने त्यांची दुसरी यादी जाहीर केली. ३४ उमेदवारांच्या या यादीमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, चंद्रकांत कवळेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, या यादीत सर्वात चर्चा झाली ती दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना डावलल्याची. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे पणजीतून लढण्यासाठी आग्रही होते. मात्र त्यांच्याऐजवी भाजपने पणजीत बाबूश मोन्सेरात यांना तिकिट दिलं आहे.

उत्पल पर्रीकर यांनी तिकिट मिळवण्यासाठी भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी त्यांना भाजपने पणजीमधून उमेदवारी नाकारली. त्यानंतर उत्पल यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं असून लवकरच भूमिका जाहीर करू असंही त्यांनी म्हटलं आहे. आता उत्पल पर्रीकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलं आहे. मात्र थोडं मागे जावून राजकीय इतिहास पाहिल्यास उत्पल यांना डावलून उमेदवारी दिलेल्या बाबूश यांच्यामुळेच पर्रीकरांची खूर्ची आणि भाजपची सत्ता गेली होती.

गोव्यात अंतान्सिओ उर्फ बाबुश मोन्सेरात हे एक बडी आसामी म्हणून ओळखले जातात. २००२ च्या निवडणुकीपासूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. बाबूश मोन्सेरात यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रॅटिक पक्षातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांनी २ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यावेळी पर्रीकरांकडे १७ जागा होत्या. तर सत्तास्थापनेसाठी ३ जागांची गरज होती.

पक्षीय बलाबल पाहता पर्रीकर यांनी मोन्सेरात आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांना सोबत घेतलं. त्यानंतर ते पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. पण तीन वर्षांनी २००५ मध्ये बाबूश मोन्सेरात यांच्यासह इतर दोघांनी पर्रीकरांचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे पर्रीकरांचे सरकार कोसळले. त्यानंतर मोन्सेरात यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं प्रतापसिंह राणे यांनी सरकार स्थापन केले. त्यांच्या सरकारमध्ये मोन्सेरात हे मंत्रीही झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT