Rahul Gandhi
Rahul Gandhi 
देश

गोव्यात पुन्हा चुकायचं नाय; काँग्रेसने निकालाआधी सुरु केली तयारी

सकाळ डिजिटल टीम

आधीच्या काही निवडणुकांमध्ये आलेल्या अनुभवातून धडा घेत काँग्रेस त्यांच्या आमदारांना बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तयारी करत आहे.

पणजी - पाच राज्यांमधील निवडणुकीसाठी मतदान प्रकिया आज पूर्ण झाली. उत्तराखंड, मणिपूर, पंजाब, गोवा (Goa) या राज्यांमधील मतदान आधीच झाले होते. तर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. दरम्यान, निवडणूक निकालानंतर होणारा घोडेबाजार रोखण्यासाठी काँग्रेसने (Congress) आतापासूनच हालचाली सुरु केल्या आहेत. आधीच्या काही निवडणुकांमध्ये आलेल्या अनुभवातून धडा घेत काँग्रेस त्यांच्या आमदारांना बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तयारी करत आहे.

काँग्रेसला गोव्यासह पंजाब, (Punjab) उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये काही उलट सुलट घडण्याची शक्यता वाटते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून वरिष्ठ नेत्यांना संबंधित राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास या नेत्यांना आघाडी आणि तडजोडीच्या प्रकरणात तात्काळ निर्णय घेण्यासाठी राज्यात पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०१७ मध्ये गोव्यात काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने १ जागा मिळवल्या होत्या. तेव्हा भाजपने इतर पक्ष आणि अपक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केलं. तर गेल्या पाच वर्षात गोव्यातील काँग्रेस आमदारांनी पक्षाला रामराम केला. यामुळे १७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे सध्या फक्त दोनच आमदार उरले आहेत.

आठवड्याभरापूर्वी काँग्रेसने गोव्यातील उमेदवारांना राहुल गांधींच्या उपस्थितीत एकनिष्ठतेची शपथ घ्यायला लावली होती. मात्र पक्षाला याची कल्पना आहे की, निकाल लागल्यानंतर त्रिशंकू स्थिती उद्भवली तर अशा परिस्थितीत केवळ एकनिष्ठतेची शपथ उपयोगी पडणार नाही. त्यामुळेच काँग्रेसने गोव्यासह पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये मिशन एमएलए सुरु केलं असल्याची माहिती मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT