corona update corona update
देश

गोवा : कोरोना रोखण्यात भाजप सरकार फेल; 'आप'चा आरोप, हेल्पलाइन सुरु

गृहविलगीकरणातील व्यक्ती यांच्यासाठी ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : कोरोना महामारीचा (corona pandemic) कहर रोखण्यात गोव्यातील भाजप (Goa BJP Government) सरकारला अपयश आलं आहे. लोकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप करत आम आदमी पक्षानं (AAP) नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना घरीच वैद्यकीय सल्ला मिळावा म्हणून आपनं हेल्पलाइनही सुरू केली आहे. (Goa BJP government fails to stop Corona AAP started helpline)

'आम आदमी पार्टी'नं पुढे येत कोरोना रुग्णांबरोबर सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी हे पाऊल टाकलं आहे. याद्वारे कोरोनासंबंधी वैद्यकीय सल्ला दूरध्वनीद्वारे दिला जाणार आहे. त्यासाठी या पक्षाने एक नंबर जाहीर केला आहे. 7504750475 या हेल्पलाइनवर कोरोनाबाधित वा त्याच्या‌ नातेवाइकांना कॉल करता येईल, असं आपनं निवेदनात म्हटलं आहे.

हेल्पलाइनला संपर्क केल्यानंतर रुग्णाला होणारा त्रास आणि संबंधित लक्षणांच्या आधारे डॉक्टर त्याला वैद्यकीय सल्ला देतील. त्यामुळे रुग्ण गंभीर आजारापासून बचाव करू शकेल. कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण, लक्षणं असलेल्या व्यक्ती आणि गृहविलगीकरणातील व्यक्ती यांच्यासाठी ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.

गोवा 'बेहाल'

गोव्यात कोरोनामुळे परिस्थितीत वाईट झाली आहेत. गेल्या सात दिवसांत सरकाराच्या हलगर्जीपणामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी स्थिती असूनही गोवा सरकार रुग्णांवर उपचार करण्यास असमर्थ ठरत आहे. रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना त्यांचे‌ प्राण गमवावे लागत असल्याची‌ टीकाही निवेदनात करण्यात आली आहे.

आपची मदत सुरू

कोरोना संबंधी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्याबरोबरच नागरिकांना ऑक्सिमीटर आणि खाद्य पदार्थांचे वितरण केले जात आहे. तसेच रुग्णांना औषधे दिली जात असून सरकारकडून उपचार मिळाला नाही, अशा रुग्णांना डॉक्टरसह वैद्यकीय सुविधा दिला जात असल्याचा दावा या पक्षानं केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT