Pramod Sawant_Narendra Modi  esakal
देश

गोव्यात शपथविधी पार पडण्याआधीच काँग्रेसचा गेम, भाजपची कोंडी

सकाळ डिजिटल टीम

गोव्यातील निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपातून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर मोदींनी प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी दिली. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासानंतर सावंत २८ मार्चला शपथविधी पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून दाखल होणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्लॅन आखला आहे. प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

निवडणुकांनंतर देशात महागाई वाढत आहे. सर्वसामान्य गोष्टींपासून इंधन आणि आता औषधांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मागील सहा दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपयांची वाढ झालीय. तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने सरकारने कोणताही ज्यादाचा भार सर्वसामान्यांवर टाकला नव्हता. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. सीएनजी आणि स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसचे दर देखील वधारले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ सुरू आहे. हाच मुद्दा पकडत शपथविधीवेळी काँग्रेस भाजपची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे.

काँग्रेसचे आमदार मायकेल लोबो यांनी जनतेला आवाहन केलंय शपथविधीला उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी मोदी आल्यानंतर त्यांना देशातील महागाईचा जाब विचारावा, असं लोबोंनी म्हटलं. यानंतर आता शपथविधीच्या कार्यक्रमात इंधन दरवाढीवरून गोंधळ होण्याची शक्यता बळावली आहे.

मायकल लोबो आधीच्या भाजप सरकारमध्ये मंत्री होते. गोव्यात निवडणुका लागण्याआदी त्यांनी काँग्रेसची वाट धरली. यंदा ते कलंगुटमधून विजयी झाले आहेत. पण काँग्रेसच्या नशीबी पराभव आल्याने लोबो आता विरोधी बाकांवर असणार आहेत. इंधन दरवाढीवरून जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याने लोबोंनी भाजप सरकारवर टीका केली. महागाईची जाणीव मोदींना करून देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Live Updates Marathi : निष्पक्षपणे चर्चा करायची असेल तर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आधी झाला पाहिजे- मल्लिकार्जून खर्गे

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT