goa bench sends notice to goa chief minister Manohar Parrikars son
goa bench sends notice to goa chief minister Manohar Parrikars son 
देश

मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला खंडपीठाची नोटीस  

सकाळवृत्तसेवा

गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत. 

नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व इतरांनी ही जनहित याचिका सादर केली आहे. ही याचिका आज खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीसाठी आली असता सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 11 मार्चला ठेवण्यात आली. या प्रतिवाद्यांमध्ये अभिजात पर्रीकर यांच्यासह वन खाते, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, नेत्रावली पंचायत, नगर नियोजक, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र देखरेख समिती यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ज्या क्षेत्रात हा ईको टुरिझम प्रकल्प उभा राहत आहे त्याचा भाग वन्यप्राणी अभयारण्याच्या सीमापासून एक किलोमीटर पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असल्याने त्याला दिलेली परवानगी बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकादारांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरले; तीन दिवसात गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

SCROLL FOR NEXT