Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घसरले; तीन दिवसात गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटींचे नुकसान

Share Market Today: सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली. बाजारात किंचित वाढ झाल्यानंतर, बेंचमार्क निर्देशांक व्यापारादरम्यान सतत घसरले आणि लक्षणीय घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, निफ्टी 140 अंकांनी घसरला आणि 22,302 वर बंद झाला.
Share Market Closing
Share Market Latest Update Sakal

Share Market Closing Latest Update 7 May 2024: सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली. बाजारात किंचित वाढ झाल्यानंतर, बेंचमार्क निर्देशांक व्यापारादरम्यान सतत घसरले आणि लक्षणीय घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, निफ्टी 140 अंकांनी घसरला आणि 22,302 वर बंद झाला.

सेन्सेक्स 383 अंकांनी घसरून 73,511 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 609 अंकांनी घसरून 48,285 वर बंद झाला. निफ्टीच्या मिडकॅपमध्ये मोठी घसरण झाली. सर्वाधिक दबाव मेटल आणि बँकिंग शेअर्सवर दिसून आला. बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक घसरत होते.

Share Market Closing
Share Market TodaySakal

निफ्टीवर, पीएसयू बँकेत 2.25%, मेटलमध्ये 2.38%, रियल्टीमध्ये 3.59%, फार्मामध्ये 1.93% आणि ऑटोमध्ये 1.80% घसरण झाली. दुसरीकडे, एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. मॅरिको, गोदरेज कंझ्युमर, ब्रिटानिया, एचयूएल या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दिसून आली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 988 अंकांनी किंवा 2 टक्क्यांनी घसरला आणि 50,000 च्या खाली 49,674 अंकांवर बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक 316 अंकांनी घसरून 16,367 अंकांवर बंद झाला. बँकिंग शेअर्सच्या घसरणीमुळे निफ्टी बँक 609 अंकांनी घसरून बंद झाला. निफ्टीचा ऊर्जा निर्देशांक 846 अंकांनी घसरून बंद झाला आहे.

Share Market Closing
Share Market TodaySakal

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारातील अस्थिर व्यवहारादरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे, तर एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बीएसई लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचसीएलच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

Share Market Closing
SEBI Decision: शेअर बाजारातील व्यवहाराचे तास वाढणार का? सेबीने नेमकं काय सांगितलं
Share Market Closing
S&P BSE SENSEXSakal

शेअर बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीमध्ये HUL, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, ब्रिटानिया, ITC, TCS आणि विप्रोचे शेअर्सचा समावेश आहे, तर टॉप लूजर्स यादीमध्ये बजाज ऑटो, पॉवर ग्रिड, ONGC, IndusInd Bank, JSW स्टील, Hindalco, टाटा मोटर्सच्या शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे.

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर बाजारात मंगळवारी निफ्टी 50 दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली बंद झाला. BSE सेन्सेक्स तीन दिवसांत 1000 अंकांनी घसरला आहे आणि BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप 11 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

Share Market Closing
Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

एका दिवसात गुंतवणूकदारांचे 4.95 लाख कोटी रुपये बुडाले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 7 मे रोजी 398.44 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच सोमवारी 6 मे रोजी 403.39 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज 4.95 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4.95 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com