देश

तेजपाल विरोधात बलात्कार प्रकरणाचा निकाल 19 मे रोजी

सकाळ डिजिटल टीम

तेजपालवर सहकारी तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. गोव्यात 2013 मध्ये बांबोळी इथल्या एका हॉटेलमध्ये थिंक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हे प्रकरणं बरंच गाजलं होतं.

म्हापसा - तेहलकाचे (tehlka) माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) याच्या विरोधातील बलात्कार प्रकरणाची सुनावणी आता बुधवार 19 मे रोजी सकाळी साडेदहा वाजे पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. न्यायालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचं कारण सांगत सुनावणी सात दिवसानंतर होईल असे म्हापसा (Mhapsa) येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश शमा जोशी (Justice Shama Joshi) यांनी स्पष्ट केले. तेजपाल प्रकरणी आज अंतिम निर्णय येईल अशी अपेक्षा करण्यात येत होते. तेजपाल विरोधात म्हापसा न्यायालयातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर 27 एप्रिलला निकाल दिला जाणार होता. मात्र तेव्हाही सुनावणीला स्थगिती दिली होती.

तेजपाल याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार) 341, 342, 354अ व 354ब या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेजपालवर सहकारी तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. गोव्यात 2013 मध्ये बांबोळी इथल्या एका हॉटेलमध्ये थिंक फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हे प्रकरणं बरंच गाजलं होतं. तेजपाल हा तेव्हापासून सशर्त जामिनावर होता.

तेजपालविरोधात पोलिस ठाण्यात संवेदनशील आणि गंभीर अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे सोपवला होता. क्राइम ब्रँचच्या तत्कालीन निरीक्षक आणि सध्याच्या पोलिस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी प्रकरणाचा तपास करून तेजपाल यांच्याविरोधात आरोपपत्र सादर केलं होतं. या खटल्याची सुनावणी इन कॅमेरा घेतली होती. या खटल्याची सुनावणी लवकर करावी असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

बलात्काराची तक्रार पोलिसात केल्यानंतर संशयिताला अटकही झाली होती. त्यानंतर सहा महिने त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणी 80 हून अधिक जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. खटल्याची सुनावणी प्राधान्याने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने संशयिताला सशर्त जामिन देण्यास मंजुरी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT