Goa Forward Party likely to merge with Congress soon esakal
देश

Goa Politics : राजकीय समीकरण बदलणार; 'गोवा फॉरवर्ड'चे लवकरच काँग्रेसमध्ये विलिनीकरण!

अकरापैकी​ आठ आमदारांच्या गटानं भाजपात प्रवेश केल्यानं गोवा काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अकरापैकी​ आठ आमदारांच्या गटानं भाजपात प्रवेश केल्यानं गोवा काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे.

Goa Politics : काँग्रेसतर्फे देशभर 'भारत जोडो आंदोलन' सुरू असताना, गोव्यात काँग्रेसच्या (Goa Congress) 11 पैकी 8 आमदारांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच काँग्रेस विधिमंडळ गट भारतीय जनता पक्षात (BJP) विसर्जित केल्याचं जाहीर केलं. त्यामुळं गोव्यात काँग्रेसला मोठं भगदाड पडलं. 3 वर्षांपूर्वी काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, आता काँग्रेसकडील विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी, तसेच काँग्रेसला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) काँग्रेसमध्ये विलिनीकरण करून आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली केंद्रीय काँग्रेसकडून सुरू झालेल्या आहेत. याबाबत विजय सरदेसाई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चाही झाली असून, ऑक्टोबरमध्ये गोवा फॉरवर्डचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊ शकतं, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.

सद्यस्थितीत काँग्रेसकडं केवळ तीनच आमदार शिल्लक

अकरापैकी​ आठ आमदारांच्या गटानं भाजपात प्रवेश केल्यानं गोवा काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे. सद्यस्थितीत काँग्रेसकडं केवळ तीनच आमदार शिल्लक राहिलेले आहेत. त्यातच नियमानुसार, गोव्यात 40 आमदारांच्या विधानसभेत 1/10 या प्रमाणानुसार चार आमदार असलेल्या पक्षाकडंच विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं. काँग्रेसकडं तीन आमदार असल्यानं सध्यातरी त्यांच्या हातून विरोधी पक्षनेतेपद निसटलं आहे. परंतु, हे पद आपल्याच ताब्यात ठेवण्यासह पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी गोवा फॉरवर्डचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलेला आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सरदेसाईंसोबत चर्चा

याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सरदेसाई यांच्यासोबत चर्चाही केलेली असून, सरदेसाई त्यासाठी तयार असल्याचं आणि पुढील महिन्यातच गोवा फॉरवर्डचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसकडं सध्या युरी आलेमाव, अॅड. कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्टा हे तीनच आमदार आहेत. हे तिन्ही आमदार प्रथमच विधानसभेत निवडून आलेले आहेत. शिवाय, पक्षाशीही प्रामाणिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT