प्रमोद सावंत google
देश

हायकोर्टाच्या निर्णयावर CM प्रमोद सावंत म्हणाले, लोकशाही अन्...

बदनामी करण्याच्या या मोहिमेवर लोकशाही आणि घटनात्मक जनादेशाचा विजय झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

बदनामी करण्याच्या या मोहिमेवर लोकशाही आणि घटनात्मक जनादेशाचा विजय झाला आहे

पणजी : गोव्यात विधानसभेसाठी मतदान झाले आहे. या काळात अनेक आरोप्रत्यारोप पहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये राजकीय टीकास्त्र सुरु होते. दरम्यान, बदनामी करण्याच्या मोहिमेवर लोकशाही आणि लोकतंत्र जनादेशाचा विजय झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 12 आमदारांविरुद्ध काँग्रेस आणि एमजीपीने दाखल केलेले अपील फेटाळल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Goa mla case)

यावेळी ते म्हणाले, 'मी निर्णयाचे स्वागत करतो. भाजप विधिमंडळ पक्षात 12 आमदारांच्या विलीनीकरणाविरोधात काँग्रेस (Congress) आणि एमजीपीने (Goa MGP) दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. बदनामी करण्याच्या या मोहिमेवर लोकशाही आणि घटनात्मक जनादेशाचा विजय झाला आहे, असे सावंत म्हणाले आहेत.

दरम्यान, गोव्यात न्यायालयाने (High Court) आमदार अपात्रता याचिका फेटाळल्यानंतर राज्यातील अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भाजप कडुन नरेंद्र सावाईकर यांचीही याप्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले 'अपात्रतेची मागणी करणाऱ्या काँग्रेस (Goa Congress) आणि एमजीपीच्या याचिका फेटाळून लावण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. निकाल देताना न्यायाधीशांनी दिलेल्या निकालामध्ये तरतूद, विभाजन, विलीनीकरण, पूर्ण खंडपीठाच्या निकालाचा परिणाम आणि इतर निकाल या सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. या पुढे जाऊन मत द्यायचे झाल्यास मला पुर्ण निकाल पहावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT