TMC MP Luizinho Faleiro esakal
देश

Luizinho Faleiro : ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का; 'या' खासदारानं दिला पक्षाचा राजीनामा

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो (TMC MP Luizinho Faleiro) यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

फालेरो यांनी 2022 मधील गोवा विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) तृणमूल काँग्रेसला (Trinamool Congress) मोठा धक्का दिलाय. आयोगानं काल तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केलाय, त्यामुळं पश्चिम बंगालमधील प्रमुख पक्ष असलेल्या तृणमूलला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मात्र, असं असतानाच तृणमूल काँग्रेसला आणखी धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो (TMC MP Luizinho Faleiro) यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

त्यांचा हा राजीनामा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी स्वीकारला आहे, अशी माहिची सूत्रांनी दिलीये. तृणमूल पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फालेरो यांनी 2022 मधील गोवा विधानसभा निवडणुकीत फातोर्डा मतदारसंघातून गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला होता.

यामुळं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल पक्षानं फालेरो यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, राज्यसभेच्या खासदार अर्पिता घोष यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत होता. पण, त्यांच्या राजीनाम्यानंतर 2021 मध्ये फालेरो यांना तृणमूल काँग्रेसची उमेदवारी दिली होती. त्यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT