Goa Political Crisis esakal
देश

गोव्यात राजकीय भूकंप होताच विधानसभा अध्यक्षांचं मोठं वक्तव्य; तवडकर म्हणाले, आता विरोधी पक्ष नेताच..

गोव्यात काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय.

सकाळ डिजिटल टीम

गोव्यात काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Goa Political Crisis : सध्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात काँग्रेसची (Congress) 'भारत जोडो यात्रा' सुरु असतानाच गोव्यात (Goa Politics) मात्र भाजपनं (BJP) काँग्रेसला जबर धक्का दिलाय. गोव्यात काँग्रेसला खिंडार पाडण्यात भाजपला यश आलंय. काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळं गोवा विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ पाहता आता विरोधी पक्ष नेताच असणार नाहीय, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर (Goa Assembly Speaker Ramesh Tawadkar) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

रमेश तवडकर म्हणाले, काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळं विधानसभेतलं त्यांचं संख्याबळ पाहता आता विरोधी पक्ष नेताच नसणार आहे. सध्या काँग्रेसकडं पुरेसं संख्याबळ नसल्यामुळं यापुढं त्यांचा विरोधी पक्ष नेता असणार नाहीय. मात्र, याबाबत कायदेशीरबाबींचा अभ्यास केला जाणार असल्याचं स्पष्ट मत तवडकर यांनी व्यक्त केलं.

तवडकर म्हणाले, येत्या डिसेंबर महिन्यात गोवा विधानसभेचं अधिवेशन होणार असून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये केलेल्या दाव्यानंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्यासह काँग्रेसचे आठ आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा सदानंद तावडेंनी ट्वीटमध्ये केला होता. त्यानंतर गोव्यात काँग्रेसला मोठा हादरा बसणार हे जवळपास निश्चितच झालं होतं. त्यानुसार, आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT