पणजी : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीनंतर गोव्यातही राजकीय धुसफूस पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यातील काँग्रेस आमदारांपैकी सहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करून बंड करण्याच्या तयारीत होते पण आठवा आमदार न मिळाल्याने त्यांचे बंड फसले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेसने खबरदारी घेत 'त्या' सहा आमदारांना वगळून आपल्या पक्षाशी प्रामाणिक असलेल्या पाच आमदारांना चेन्नईला हलवले आहे.
(Goa Politics And Congress MLA's)
महाराष्ट्रातील बंडामुळे सत्तांतर झाल्याचं उदाहरण ताजं असताना त्याचे पडसाद गोव्यातही दिसून यायला लागले आहे. गोव्यातील काँग्रेसच्या ११ पैकी ६ आमदार पक्षाशी बंड करण्याच्या तयारीत होते. गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे त्यामुळे या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला मोठा बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्याचबरोबर सहा आमदारांनी बंड करण्याची तयारी केली होती पण ऐनवेळी आठवा आमदार न मिळाल्याने काँग्रेसकडून त्याव्यतिरिक्त असलेल्या पाच आमदारांना चेन्नईला हलवण्यात आलं आहे. त्यामध्ये संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा यांचा सामावेश आहे. या आमदारांची भाजपशी जवळीक होऊ नये यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने दखल घेतली असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान चेन्नईला हलवण्यात आलेल्या आमदारांना संपर्क केला असता गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याशी चर्चा करायची असल्यामुळे चेन्नईला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यांना भाजपात प्रवेश करण्यापासून थांबवण्यासाठी चेन्नईला हलवले असल्याचं बोललं जातंय. त्याबरोबरच सहा आमदार गोव्यात सोडून या पाच आमदारांना चेन्नईला का हलवले गेले असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस वाढत असल्याचं उघड झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.