amit shah esakal
देश

राहुल गांधींना झालाय 'मोदी फोबिया'; अमित शहांचा गोव्यात हल्लाबोल

फक्त भाजपचं गोव्यात सरकार स्थापन करु शकतं असा केला दावा

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोदी-फोबिया झाला आहे, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला आहे. गोव्यात भाजपच्या निवडणूक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गोव्यात केवळ भाजपचं सरकार स्थापन करेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. (Goa polls 2022 Rahul Gandhi suffering from Modi Phobia says Amit Shah)

इनडोअर सभेत बोलताना शहा म्हणाले, "गांधी परिवारानं गोव्याकडं केवळं टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून पाहिलं. पर्यटनासाठीच ते स्वतः गोव्यात येत होते. पण भाजपनं अर्थात मनोहर पर्रिकरांनी सूवर्ण गोव्याचं स्वप्न सत्यात उतरवलं. त्यामुळं आता गोव्यातील जनतेला भाजपचा 'सूवर्ण गोवा' पाहिजे की काँग्रेसचं 'गांधी कुटुंबियांचा गोवा' पाहिजे?" छोट्या राज्यांचा विकास हाच मोदी सरकारचा प्राधान्याचा विषय आहे, असंही यावेळी शहा म्हणाले.

काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना शहा म्हणाले, "दिगंबर कामत सरकारच्या काळात गोवा भ्रष्टाचार, अस्थिरता आणि अनागोंदीसाठी बदनाम झाला होता. राहुल गांधींनाही 'मोदी फोबिया' झाला आहे" गोव्यात येत्या १४ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे तर १० मार्च रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Munciple Election 2025 : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! अर्ज मागे घेऊ नये म्हणून भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं, आमदार परिणय फुके दाखल

Akol crime: अकोल्यात रेल्वेखाली उडी घेऊन प्रेमीयुगलानं संपवलं जीवन; सरत्या वर्षाला निरोप अन् उचलले टोकाचे पाऊल!

Latest Marathi News Live Update : अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रवी राणा यांच्या भेटीला

India Squad For New Zealand ODIs : ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट, मोहम्मद शमी पुन्हा दुर्लक्षित! भारताच्या वन डे संघात अचंबित करणारे निर्णय...

Daily Good Habits: मन फ्रेश अन् अ‍ॅक्टिव ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला ‘हा’ कानमंत्र पाळा, तणाव होईल गायब

SCROLL FOR NEXT