goa
goa 
देश

गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार जाहीर

अवित बगळे

पणजी : लोकसभा व विधानसभा पोट निवडणुकीची घोषणा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गोवा सुरक्षा मंचाने मांद्रे व शिरोडा विधानसभा पोट निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा आज केली. मांद्रे मतदारसंघातून स्वरुप जयदेव नाईक तर शिरोड्यातून संतोष पंढरी सतरकर हे गोसुमंचे उमेदवार असतील असे पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी जाहीर केले.

ते म्हणाले, म्हापसा मतदारसंघातून पक्षासमोर दोन नावे आहेत. त्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल आणि त्या नावाची घोषणा 17 मार्च रोजी केली जाईल. लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा 19 मार्च रोजी केली जाईल. गोसुमं उमेदवारीसाठी नेत्यांची आयात करणार नाही तर भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात 2011 पासून सक्रीय असलेल्यांनाच उमेदवाऱ्या दिल्या जातील असे वेलिंगकर यांनी जाहीर केले. मांद्रे येथील प्रचार कार्यालयाचे 13 मार्च रोजी कर शिरोडा येथील कार्यालयाचे उद्धाटन 14 रोजी करण्यात येणार आहे.

मांद्रे मतदारसंघात कॉंग्रेसची आमदारकी सोडून भाजपमध्ये आलेले दयानंद सोपटे हे भाजपचे उमेदवार आहेत तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही भाजपची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार आहेत. शिरोडा मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री महादेव नाईक हे कॉंग्रेसमध्ये आले असून ते भाजपचे उमेदवार असतील तर भाजपची आमदारकी सोडून भाजपमध्ये गेलेले सुभाष शिरोडकर हे भाजपचे उमेदवार असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT