Goas former health minister Dr Suresh Amonkar loses battle against Covid-19
Goas former health minister Dr Suresh Amonkar loses battle against Covid-19 
देश

गोव्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांचे कोरोनामुळे निधन 

वृत्तसंस्था

पणजी : गोव्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे निधन झाले असून त्यांना रुग्णालयातच कोरोनाची लागण झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मंत्र्यांना आदरांजली अर्पण केली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी कोरोनामुळे आमोणकरांचे निधन झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. सुरेश आमोणकर हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्षही होते. मडगावच्या कोविड रूग्णालयात त्यांचे निधन झाले. आमोणकरांना मूत्रपिंडाचा त्रास होता पण त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. आमोणकरांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. ते डायलसिसवर होते. ते ज्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जात होते. त्याच रुग्णालयात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
-------------
चिंताजनक ! गेल्या २४ तासात ब्राझीलनंतर भारतात जगातील सर्वाधिक मृत्यू
-------------
भारत-चीन युद्ध झाल्यास अमेरिका मैदाना उतरणार; व्हाईट हाऊसची घोषणा
-------------
गोव्यात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. आमोणकर हे पाळी म्हणजे आताचे साखळी मतदारसंघाचे आमदार म्हणून १९९९ आणि २००२ अशा दोन निवडणुकांवेळी निवडून आले होते. आमोणकर अगोदर फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर पर्रीकर मंत्रिमंडळात मंत्री होते. आरोग्य खाते सांभाळणारे आमोणकर हे अतिशय मितभाषी, शांती व सौम्य स्वभावाचे डॉक्टर आणि मंत्री होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT