Money e sakal
देश

खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत महागाई भत्ते

२६ जूनच्या बैठकीत होणार प्रक्रिया निश्चित

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर असून त्यांना गेल्या १८ महिन्यांपासून रखडलेला महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई दिलासा (DR) लवकरच मिळणार आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाकडून अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल काउन्सिल ऑफ जेसीएमची २६ जून रोजी डीओपीटी आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ही थकबाकी किंवा फरक कर्मचाऱ्यांना कसा अदा करायचा याबाबत चर्चा होणार आहे. याचा फायदा ४८ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना तसेच ६० लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. (Good news Central employees will soon get DA DR and Arrears early)

स्टाफ साईडच्या राष्ट्रीय परिषदेत कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी अर्थ मंत्रालयासोबत अनेक बैठका पार पडल्या आहेत. परिषदेचे वरीष्ठ अधिकारी शिवगोपाल मिश्रा यांच्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयात राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलंय की, कर्मचाऱ्यांना त्यांची डीएची रक्क मिळेल. केंद्राचे ४८ लाख कर्मचारी आणि ६० लाख पेंशनर्स गेल्या १८ महिन्यांपासून महागाई भत्ते तसेच महागाई दिलासा मिळण्याची वाट पाहत आहेत. जानेवारी २०२० पासून हे भत्ते बंद मिळालेले नाहीत. याशिवाय दुसरे इतर भत्ते जसे एलटीसी देखील बंद आहे. कर्मचाऱ्यांचा डीए मे २०२० मध्ये २१ टक्के होता. एक जुलै २०२१ रोजी तो ३१ टक्के झाला.

कोरोना काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सरकारला केली मदत

सैन्यदल, रेल्वे, आरोग्य, ग्रामीण विकास, कृषी आणि इतर केंद्रीय मंत्रालयांमध्ये काम करमाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात सरकारला मदत केली आहे. सरकारने २०२० च्या सुरुवातीला एक अचानक मोठी घोषणा केली होती, त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए, डीआर आणि दुसरे भत्ते मिळणार नाहीत, असं म्हटलं होतं. पण त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी सरकारसोबत कोरोनाच्या संकटकाळातही चांगलं काम केलं होतं.

डीए, डीआर आणि एरिअर्स एकाचवेळी मिळण्याची शक्यता

शिवगोपाल मिश्रा यांच्या माहितीनुसार, केंद्राला हे सांगाण्यात आलं आहे की, डीए, डीआर आणि एरिअर्स एकाच वेळी देण्यात यावेत. जर एरिअर्स आणि इतर भत्ते एकाच वेळी देणं शक्य नाही. त्यामुळे छोट्या टप्प्यांच्या अंतरानं हे भत्ते देण्यात येतील. केंद्राचे विद्यमान कर्मचारी आणि माजी कर्मचारी जानेवारी २०२० पासून हे भत्ते मिळण्याची वाट पाहत आहेत. कॅबिनेट सचिवांना पहिल्या १८ महिन्यांच्या एरिअर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. जानेवारी २०२० पासून नोव्हेंबर २०२० पर्यंत २४ टक्के, डिसेंबर २०२० पासून मे २०२१ पर्यंत २८ टक्के आणि जून २०२१ पासून जुलै २०२१ पर्यंत डीएचा आलेख वाढत ३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT