Google Issues Apology  
देश

Google Issues Apology : ‘गुगल’ने मागितली भारताची माफी! ‘जेमिनी’च्या गोंधळासंदर्भात केंद्राच्या नाराजीनंतर उपरती

Google Issues Apology in AI controversy : गुगलने आपले चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गोंधळाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे.

रोहित कणसे

न्यूयॉर्क : गुगलने आपले चॅटबॉट जेमिनी मधील आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या गोंधळाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. या गोंधळासंदर्भात सीईओ सुंदर पीचाई यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

या गोंधळासंदर्भात गुगलवर जोरदार टीका झाली होती. या चॅटबॉट च्या विश्वासार्हतेवरही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. केंद्र सरकारनेही याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे गुगलने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर गुगलच्या जेमिनी चॅटबॉटवर अविश्वासार्ह आणि अस्विकारार्ह तपशील आल्याचे आरोप झाले होते. याप्रकरणी जेमिनीने दिलेल्या प्रतिसादातील तफावतीसंदर्भातही गुगलला केंद्र सरकारने स्पष्टीकरण मागणारी नोटीस बजावली होती. ही माहिती आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

भारतात कार्यरत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या छाननीसाठी सरकारवर दबाव वाढत असतानाच केंद्र सरकारने त्यांच्या परवान्यासंदर्भातही काही नियम प्रस्तावित केले आहेत. या एआय प्लॅटफॉर्म्सना भारतातील आयटी आणि गुन्हेगारी कायद्यासंदर्भातील कायदेपालनाची जाणीव करून देतानाच त्यांनी भारतीय ग्राहकांना महत्त्व द्यावे यावरही चंद्रशेखर यांनी भर दिला आहे.

गुगलच्या जेमिनी चॅटबॉटने माहिती देताना वर्णभेद विषयक पक्षपात केल्याचे तसेच ऐतिहासिक माहिती देताना अचूकता दाखवली नसल्याचाही आरोप आहे. जेमिनीने यासंदर्भात व्यक्तींची चित्रे निर्माण करताना हा वंशद्वेष केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुंदर पिचाई यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव होता.

त्यामुळे गुगलने जेमिनी चॅटबॉटची मानवी प्रतिमा निर्माण करण्याची क्षमता तात्पुरती खंडित केली. पीचाई यांनीही या चुकीचा निषेध केला. ही चूक अस्विकारार्ह असून या परिस्थितीत सुधारणा केली जाईल, असेही ते म्हणाले. तरीही गुगलवर जोरदार टीका झाल्यामुळे आज त्यांनी हे माफीचे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे. भविष्यात गुगलच्या जेमिनी चॅटबॉटची मानवी प्रतिमा निर्मितीची क्षमता विकसित केली जाईल, असेही सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT