goons killed jammu kashmir terrorist commander
goons killed jammu kashmir terrorist commander sakal
देश

'आयएसआय'चा मोठा अपमान! दहशतवादी कमांडरला घरात घुसुन ठार केले...

सकाळ वृत्तसेवा

जम्मू-काश्मीरमधील अल-बद्र नावाच्या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानचा माजी कमांडर कराचीमध्ये ठार झाला आहे. तो पाकिस्तानमधील सुरक्षा एजन्सी आयएसआयच्या सेफ हाऊस मध्ये होता, तिथेच हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.

हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी माजी कमांडरची हत्या का केली? याचा अजूनही खुलासा झालेला नाही.

सय्यद खालिद रझा यांच्यावर कमी अंतरावरून गोळी झाडण्यात आली आहे. ते आपल्या घराबाहेर पडत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली त्यात त्याचा मृत्यु झाला आहे. गुलिस्तान-ए-जौहरमधील ब्लॉक-7 मध्ये तो राहत होता.

भारतात दहशत पसरवण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या लोकांचा वापर करणाऱ्या पाकिस्तानी आयएसआयसाठी रझा यांची हत्या ही मोठी लाजिरवाणी बाब आहे. खालिद रझा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या पद्धतीवरून हे टार्गेट किलिंग असल्याचे दिसून येत आहे.

माजी कमांडरचा मृत्यू हा टार्गेट किलिंगच

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल-बद्रच्या माजी कमांडरच्या खिशात 70 हजार रुपये सापडले असून त्याच्या हातात महागडे घड्याळ होते. हा हल्ला लूट आणि दरोड्याचा असता; तर लूटमार करून नेली असती, असे जाणकारांचे म्हणणे आहे, मात्र हे टार्गेट किलिंगचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे, खालिदला वाचवण्यात अपयशी ठरलेले पोलीस हे प्रकरण दरोडा म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत होते.

सय्यद खालिद रझा काेण हाेता

रझा हा पाकिस्तानच्या आयएसआयने स्थापन केलेल्या अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा माजी कमांडर होता. मीडिया रिपोर्टमध्ये एका सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत दोन लोक सलवार-कमीजमध्ये दिसत आहेत. ते मोटारसायकलवरून आणि टोपी घालून आले होते.

ही हत्या करून ते पळून गेले . अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा माजी कमांडर होता, त्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी या दहशतवादी संघटनेचा खात्मा केला, जिथे आयएसआयला रझा यांना वाचवण्यात यश आले होते.

तत्पूर्वी घरात घुसून हल्लेखोरांनी आणखी एका दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार केले होते. बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम हा हिजबुलचा टॉप रँक कमांड होता, ज्याला रावळपिंडीमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT