Security personnel conducting an intense search operation after a bomb threat on the Gorakhpur–Mumbai passenger train, causing panic among travelers.
esakal
Bomb Threat Reported on Gorakhpur–Mumbai Passenger Train : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी आज (मंगळवार) एका ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. यानंतर रेल्वे पोलिसांना तत्काळ सतर्क करण्यात आले. रेल्वे नियंत्रण कक्षाला एका लँडलाइन फोनवरून गोरखपूर-एलटीटी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती देणारा कॉल आला होता. या कॉलनंतर सुरक्षा यंत्रणांना तत्काळ सतर्क करण्यात आल
स्थानिक पोलिसांच्या मदतीने, भदोही रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशांना उतरवण्यात आले आणि संपूर्ण ट्रेनची तपासणी सुरू झाली. सध्या शोध मोहीम सुरू आहे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.
ट्रेन भदोही येथे येताच, प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आणि सर्वांना प्लॅटफॉर्मवर थांबवण्यात आले. त्यानंतर पोलिस आणि सुरक्षा दलांनी डब्यांमध्ये शोध घेतला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शौचालये आणि सामान ठेवण्याच्या जागांसह ट्रेनच्या डब्यांची कसून तपासणी केली. तर घटनेनंतर स्टेशनवर अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले.
प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. तथापि, परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणण्यात आली. रेल्वे आणि पोलिस अधिकारी कॉलची सत्यता आणि कॉल करणाऱ्याचा शोध घेत आहेत. तर शोधमोहीम अजूनही सुरू आहे. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.