Siren Sound Ban in News amid war tension esakal
देश

Siren Ban in News : टीव्हीवरील बातम्यांमध्ये सायरनचा आवाज वापरण्यास बंदी! माध्यमांना कडक सूचना, सरकार म्हणाले...

Siren Sound Ban in News amid war tension : भारत सरकारने हवाई हल्ला सायरनचा प्रसारमाध्यमांतील वापर बंदी घातली आहे. नागरिकांचा गोंधळ टाळण्यासाठी आणि दक्षता टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे

Saisimran Ghashi

Siren Ban in News : नियंत्रण रेषेवर (LoC) वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व प्रसारमाध्यमांना आता नागरिक संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या 'एअर रेड सायरन'चा आवाज बातम्यांमध्ये वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने यासंदर्भात 10 मे रोजी अधिकृत सूचना जारी केली आहे.

'ऑपरेशन सिंदूर'च्या कव्हरेजवरून निर्माण झाली चिंता

'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी मोहिमेच्या वृत्तांकनादरम्यान अनेक टीव्ही चॅनेल्सनी वातावरण अधिक नाट्यमय करण्यासाठी एअर रेड सायरनसारखे आवाज वापरले होते. मात्र या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरिक संरक्षण आणि होमगार्डसच्या महासंचालनालयाने जारी केलेल्या सल्लागार सूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, या आवाजांचा सतत आणि अयोग्य वापर केल्यास जनतेमध्ये खरी आपत्कालीन सूचना आल्यानंतर ती गंभीरपणे घेण्याची प्रवृत्ती कमी होईल.

नागरिक संरक्षण प्रसारण विभागाचे अतिरिक्त महासंचालक उमेश शर्मा यांनी सांगितले की, "एअर रेड सायरन हे जनतेला तातडीची सूचना देण्यासाठी वापरण्यात येतात. जर हे आवाज सामान्य बातम्यांमध्ये वापरले गेले, तर नागरिक त्यांना कंटाळून जातील आणि खरी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ते दुर्लक्षित करण्याची शक्यता वाढेल."

सीमेवरील वाढता तणाव आणि पाकिस्तानची हालचाल

दरम्यान, पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर लष्करी हालचालींना वेग आला आहे. भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करत असलेल्या ड्रोन हल्ल्यांचे, लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचे आणि फायटर जेट्सच्या हालचालींचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानकडून मानवविरहित युद्ध उपकरणं (UCAV), लुटिंग म्युनिशन्स आणि इतर अत्याधुनिक साधनांची तैनाती केली जात आहे. काही भागांत नागरिकांवर गोळीबार आणि ड्रोन घुसखोरीच्या घटना देखील नोंदवल्या गेल्या आहेत.

भारतीय लष्कर सतर्क, सरकारची स्पष्ट भूमिका

या पार्श्वभूमीवर भारताचे सशस्त्र दल पूर्णपणे सज्ज असून सीमावर्ती भागात गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्याचे निदर्शनास आणले आहे. अशा संवेदनशील काळात नागरिकांना खऱ्या आपत्कालीन परिस्थितीत सजग ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सरकारने नमूद केले आहे.

प्रसारमाध्यमांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन

गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे प्रसारमाध्यमांवर जबाबदारीची अधिक जाणीव होण्याची गरज निर्माण झाली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोष्टींचे सादरीकरण करताना अति नाट्यमय प्रभावांऐवजी अचूकता आणि संवेदनशीलता ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. आपत्कालीन प्रसारणाची स्पष्टता आणि जनतेचा जागरूक प्रतिसाद कायम राहावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT