corona vaccine. 
देश

खुशखबर! कोरोना लसीची किंमत घटली; प्रति डोस 200 रुपयांपेक्षाही कमी येणार खर्च

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काल गुरुवारी केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोनावरील लसीची किंमत कमी करण्याबाबत चर्चा झाली असून ती सध्याच्या किंमतीपेक्षा निश्चितच कमी असणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हटलंय की, सरकार कोविशील्ड लसीची किंमत पुन्हा एकदा ठरवत असून ती नक्कीच सध्याच्या किंमतीपेक्षा लक्षणीयरित्या कमी असेल. तिची किंमत 200 रुपये प्रति डोस या किंमतीपेक्षा कमी असणार आहे. 

सध्या तरी सरकारने खासगी आरोग्य सुविधांना एका डोससाठी 250 रुपये शुल्क घेण्यास परवानगी दिली आहे. भारताने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे या ठिकाणी तयार झालेली कोविशील्ड ही लस त्यापैकी एक आहे. 

या लसीची निर्मिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेका या कंपनीच्या माध्यमातून झाली आहे. या लसीचे भारतातून उत्पादन सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार कोविशील्ड लस कमी किंमती खरेदी करणार असून ती किंमत कर वगळता 150 रुपये प्रति डोसपेक्षाही कमी असू शकते. याआधी, सरकारकडून करांसहीत 210 रुपये प्रति डोसप्रमाणे लस खरेदी करण्यात येत होती. लसीचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचंही राजेश भुषण यांनी स्पष्ट केलं आहे. काल 11 मार्चपर्यंत भारतात आतापर्यंत एकूण 2,56,90,545 लोकांना लस देण्यात आली आहे. जगातील सर्वांत मोठी लसीकरणाची मोहीम ही भारतात होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT