Nirmala Sitharaman_Finance Minister 
देश

"सरकारचा अ‍ॅटिट्यूट म्हणजे..."; महागाईवरील सीतारामण यांच्या उत्तरावर काँग्रेसची टीका

भारतात आर्थिक मंदीची शून्य शक्यता असल्याचं विधान अर्थमंत्र्यांनी केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील महागाईवरील प्रश्नावर सोमवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामण यांनी देशाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचं सांगितलं. या उत्तरावर आता काँग्रेसनं पलटवार केला आहे. सरकारचा अॅटिट्यूड म्हणजे देशात महागाई नाहीच, असा असल्याचं काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे. (govt attitude is no inflation in country Congress criticizes Sitharaman answer on inflation)

तिवारी म्हणाले, "अर्थमंत्र्यांचं उत्तर हे निराशाजनक होतं. त्यांच्या बोलण्यातून सरकारचा अॅटिट्यूड देशात महागाई नाहीच, लोकांना महागाईचा त्रास होत नाहीए. सर्वकाही व्यवस्थित, छान चाललंय असा होता. जर देशातील १४० कोटी जनतेचा आवाज उठवणाऱ्या विरोधकांना जर तुम्ही उत्तर देत असाल तर आता काय बोलायच?"

दरम्यान, लोकसभेत आज महागाईवर चर्चा पार पडली. यावेळी विरोधकांनी महागाई संदर्भात अनेक मुद्दे मांडले. विरोधकांच्या या मुद्द्यांना नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संध्याकाळी ७ वाजता उत्तर दिलं. या उत्तरात त्यांनी देशात महागाई नाही उलट आपली अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचं म्हटलं. त्यामुळं देशात आर्थिक मंदीची शून्य शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच विरोधकांनी महागाईवरील चर्चेदरम्यान यावरील राजकीय मुद्देच जास्त प्रमाणात उपस्थित केले, प्रत्यक्ष आकडेवारीवर बोललेच नाहीत, असंही सीतारामण म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT