Govt. documents burnt at Kolkata
Govt. documents burnt at Kolkata 
देश

Govt Docs Burnt: प. बंगालमध्ये सरकारी कागदपत्रं कचऱ्यात जाळली! CBIच्या अधिकाऱ्यांची पळापळ

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सरकारी कागदपत्र कचऱ्यात जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे काही महत्वाच्या प्रकरणांबाबतची ही कागदपत्रं असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. यापार्श्वभूमीवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली असून याप्रकरणी केंद्रीय सशस्त्र बलाच्या जवानांना देखील पाचारण करण्यात आलं आहे. (Govt Documents Burn In Bengal CBI Suspects Scam Link)

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, कोलकातामधील भांगर इथल्या अंडुल-गरिया भागातील खुल्या जागेमध्ये काही सरकारी कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर जाळण्यात येत असल्याचं स्थानिकांना दिसून आलं. सोमवारी रात्री हा कागदपत्रांचा कचरा मोकळ्या जागेमध्ये फेकून देण्यात आला होता. त्यावेळी लोकांना याची शंका आली नाही, पण मंगळवारी दुपारी त्यांनी पाहिलं की, या कागदपत्रांना आग लावण्यात आली होती. ही कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर मात्र हा गंभीर प्रकार असू शकतो याची शंका त्यांना आली. यानंतर याची माहिती पोलिसांपर्यंत गेली.

दरम्यान, सीबीआयच्या अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती गेल्यानं त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील कोणत्या घोटाळ्यासंबंधी ही कागदपत्रे असून ज्याची चौकशी केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरु असल्याचा संशय या अधिकाऱ्यांना असल्याचंही सांगण्यात येत आहे. या प्रकाराच्या चौकशीसाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ज्या जागेत ही कागदपत्रे जाळण्यात आली त्या जागेच्या मालकाला चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे.

पण सीबीआयनं ही आग विझवण्यासाठी थेट केंद्रीय सशस्त्र बलाच्या जवानांना पाचारण केल्याचंही सांगण्यात येत आहे. या जवानांनी तात्काळ संबंधित जागेला वेढा दिला आणि ही आग विझवून कागदपत्रे पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: भारताच्या निवडणुकीत अमेरिका खरंच हस्तक्षेप करत आहे का? वाचा, रशियाच्या आरोपावर अमेरिकेने काय दिले उत्तर

IPL 2024 Playoffs: मुंबईपाठोपाठ पंजाबचंही आव्हान संपलं, आता प्लेऑफची शर्यत 8 संघात; जाणून घ्या समीकरण

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Live Update : श्री केदारनाथ धामवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Voter Slip : मतदार यादीत नाव शोधण्यापासून सुटका ; पहिल्यांदाच स्मार्ट व्होटर स्लिप उपक्रम

SCROLL FOR NEXT