graduate student commits suicide by bursting firecrackers in mouth over unable to pursue higher education  
देश

Crime News : बापरे! तोंडात सुतळी बॅाम्ब फोडून तरुणाची आत्महत्या; कारण ऐकून व्हाल थक्क

रोहित कणसे

शिक्षण घेताना अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढत बरेच जण त्यांचं शिक्षण पूर्ण देखील करतात. पण देशात असेही बरेच लोक आहेत ज्यांना अशी संधी मिळत नाही. मध्य प्रदेशात श्योपुर येथे उच्च शिक्षण घेण्याकरिता पैसे नसल्याने अशाच एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या तरुणाने चक्क तोंडात सुतळी बॉम्ब फोडून आत्महत्या केली आहे. बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या या तरुणाचं वय २४ वर्ष होतं. मध्यप्रदेशातील श्योपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणाचं नाव ब्रजेश प्रजापती असं सांगितले जात आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब होती आणि त्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरात पाठवण्याचा प्रयत्न कुटुंब करत होतं.

या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रजेश हा सकाळी ९ वाजता शौचालयात गेला आणि तेथे त्यांनी स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून आत्महत्या केली. बॉम्बचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य धावत गेले. मात्र तो या स्फोटाने गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

ब्रजेशच्या मोठ्या भावाने सांगितलं की तो अभ्यासात चांगला हुशार होता आणि स्थानिक कॉलेजमध्ये बीएससीचे शिक्षण घेत होता. त्यांने सांगितले की त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तेवढी चांगळी नसल्यामुळे ब्रजेशला मोठ्या शहरात पाठवता आलं नाही. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : कागल मध्ये मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाची माघार

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

SCROLL FOR NEXT