Uddhav Thackeray And BJP esakal
देश

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निकालात भाजप "तुपाशी" तर उद्धवजींची सेना "उपाशी"

ग्रामपंचायत निवडणुकीत वरचष्मा कुणाचा हे सांगणे अवघड असते

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

स्थानिक राजकारण कोणत्याही पक्षाच्या दावणीला न बांधता गावात आघाडया तयार केल्या जातात.बडया पक्षांना आम्ही तुमचेच असे सांगितले जाते .त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत वरचष्मा कुणाचा हे सांगणे अवघड असते.खरे जिंकलेले असतात ते कुणाच्याही अध्यात मध्यात नसलेले अपक्ष. ग्रामपंचायत निवडणुका खरे तर कोणत्याही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक मान्यताप्राप्त पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत तरीही पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाडीसह मिळवलेल्या यशाची आकडेवारी देत असतो.

आज निकाल घोषित झाले आहेत आणि भारतीय जनता पक्ष ग्रामीण भागातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष प्रमुख पाच पक्षांच्या यादीत सर्वाधिक खालच्या पातळीवर गेला आहे.सत्तांतरानंतर सत्तारुढ युतीला नेत्रदीपक यश मिळाले आहे.आमदारांनी त्यांच्या हातात आलेली सत्ता वापरत आपापल्या प्रभाव क्षेत्रात विजय खेचून आणल्याचे चित्र सत्ताधार्यांबाबत स्पष्ट दिसते आहे.भाजप तर विजेता ठरला आहेच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षालाही घवघवीत यश मिळाले आहे. भाजपला गावपातळीवर कायम स्पर्धा करावी लागते ती राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आजच्या निकालात मात्र भाजपने २३४८ जागा जिंकल्या आहेत पण राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ १२८७ जागा जिंकता आल्या आहेत.

शिंदे गटाला ८४२ तर ठाकरे गटाला ६३७ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.कॉंग्रेसने ८०९ जागा जिंकल्या. सरपंचपदाच्या एकूण जागा ७,६१९.त्यातील ६९९ जागी निवडणूक बिनविरोध पार पडली.६३ ग्रामपंचायतीत निवडणुकीसाठी एकही अर्ज आला नाही.ग्रामपंचायतीच्या ६५ हजार ९१६ जागांवर सदस्य निवडून द्यायचे होते.काही ठिकाणी मतमोजणी अद्याप सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली

Amravati News: अमरावती जिल्ह्यात ९२ हजार सावकारी कर्जदार; १३० कोटींचे वितरण, २४ अवैध सावकारांविरुद्ध धाडी, दोघांविरुद्ध फौजदारी

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

SCROLL FOR NEXT