Stray Dog Attack esakal
देश

Gram Panchayat : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यास आता ग्रामपंचायत देणार नुकसान भरपाई; लाख रुपयांपर्यंत करणार मदत

बृहनबंगळुरू महापालिकेने यापूर्वीच लागू केलेले नियम ग्रामपंचायतींत लागू केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कुत्र्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ५० हजार नुकसानभरपाई, तर प्रौढांसाठी १ लाख नुकसान भरपाई म्हणून दिले जातील.

बेळगाव : ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) हल्ल्यात जखमी होणाऱ्या व्यक्तीचा वैद्यकीय खर्च ग्रामपंचायतीला यापुढे करावा लागणार आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीकडून (Gram Panchayat) भरपाई मिळणार आहे.

ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने (Panchayat Department) याबाबत आदेश बजावला आहे. भटक्या कुत्र्यांचे संरक्षण, संतती नियंत्रण, भटक्या कुत्र्यांवर उपचार आणि निगा याबाबत विविध मार्गदर्शक तत्त्वे ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने जाहीर केली आहेत.

त्यात संबंधित ग्रामपंचायतींनी भटक्या कुत्र्यांनी चावलेल्या व्यक्तींना वैद्यकीय खर्चाची भरपाई द्यावी. मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई‌ दिली जावी, असे ही स्पष्ट केले आहे. बृहनबंगळुरू महापालिकेने यापूर्वीच लागू केलेले नियम ग्रामपंचायतींत लागू केले आहेत.

अशी असेल भरपाई

भटक्या कुत्र्याने चावल्यानंतर मोफत उपचार सुविधा उपलब्ध नसल्यास चाव्याच्या तीव्रतेनुसार २ ते ३ हजार रुपये नुकसान भरपाई आणि १ ते २ हजार रुपये वैद्यकीय उपचार खर्च दिला जावा. कुत्र्याचा मोठा हल्ला असल्यास १० हजार नुकसान भरपाई आणि ५ हजार वैद्यकीय खर्च दिला जाईल.

कुत्र्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ५० हजार नुकसानभरपाई, तर प्रौढांसाठी १ लाख नुकसान भरपाई म्हणून दिले जातील. अंत्यसंस्कारासाठी ५ हजार आणि मृत्यूपूर्वी झालेला वैद्यकीय खर्च ग्रामपंचायत भरणार आहे.

मार्गदर्शक तत्त्वे...

  • भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी शुल्क भरून तालुकास्तरावरील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रांच्या सेवांचा लाभ घ्यावा.

  • आक्रमक आणि चावणारे कुत्रे आणि रेबीजचा संशय असलेल्या कुत्र्यांना स्ट्रे डॉग ब्रीड कंट्रोल सेंटरमध्ये वेगळे केले जावे आणि या कुत्र्यांना २० दिवस निरीक्षण युनिटमध्ये ठेवावे.

  • संशयित रेबीज कुत्र्याचा १० दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास, त्याच्या मेंदूचे नमुने गोळा करून रेबीजच्या उपस्थितीच्या तपासणीसाठी रेबीज प्रयोगशाळेत पाठवावेत.

  • प्रत्येक तालुका स्तरावर पशु कल्याण संस्था/पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग यांच्या मदतीने भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात यावी.

  • तालुकास्तरीय समितीने पशु कल्याण संस्था नियमानुसार पशु संतती नियंत्रण कार्यक्रम राबवत असल्याची खात्री करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT