grandma refuse to give 100 rupees to grandson killed to death  esakal
देश

Crime News: दारु पिण्यासाठी १०० रुपये दिले नाहीत, नातवानं आजीचे कुऱ्हाडीनं केले तुकडे

सकाळ डिजिटल टीम

लोक दारू पिण्यासाठी कुठल्या थराला जातील सांगता येत नाही. दारू पिण्यासाठी आजीने 100 रुपये न दिल्याने नातवाने आजीची कुऱ्हाडीने तुकडे केल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. याघटनेत आजीच्या मदतीसाठी धावून आलेल्या वडिलांचा हातालाही जखम झाली आहे. घटनेनंतर आरोपी पत्नी आणि मुलांसह फरार झाला. उत्तर प्रदेशमधील लखनऊ परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपीचे वडील सुरेश कुमार यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अनिश कुमार काल रात्री सासरहून घरी परतला होता. घरी परतल्यानंतर त्याने आजीकडे 100 रुपये मागितले होते. नातवाने दारूसाठी पैसे मागितले असता आजीने नकार दिला. यानंतर आरोपीने वडिलांकडे पैसे मागितले असता वडिलांनी त्याला फटकारले आणि काठी घेऊन पायावर मारली.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

वडिलांनी मुलाला फटकारले तेव्हा त्याचा राग आनावर झाला. आरोपींनी घरात ठेवलेली कुऱ्हाड आणून आजीवर हल्ला केला. त्याने आजीवर कुऱ्हाडीने वार करून तीला ठार केले. वडील मदतीला धावले असता त्यांचा हातला देखील जखम झाली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, एडीसीपी दक्षिण मनिषा सिंह घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घटनेचा आढावा घेतला. त्यांनी आरोपीच्या वडिलांचा जबाब घेतला. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT