PM Narendra Modi esakal
देश

PM मोदींचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरणार होते, मात्र 3KM दूर... पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठा निष्काळजीपणा!

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्या ठिकाणी होणार होती. तिथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कांडी कॅनॉलचा उगम होतो. या कालव्याचे गेट कोणीतरी उघडले होते.

Sandip Kapde

PM Narendra Modi

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा दणदणाट थांबला आहे. आता शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी गुरुवारी पंजाबमधील होशियारपूरमध्ये आपला निवडणूक प्रचार संपवला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठा निष्काळजीपणा झाल्याची माहिती समोर आली आहे.

होशियारपूर येथे मोदी यांच्या निवडणूक रॅलीदरम्यान मोठा निष्काळजीपणा झाला. मोदींच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी ज्या ठिकाणी हेलिपॅड बांधले होते, तिथून तीन किलोमीटर अंतरावर कोणीतरी कालव्याचे पाणी उघडले होते. त्यामुळे कालव्याचे पाणी हेलिपॅडकडे आले. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने हेलिपॅडपासून ३ किलोमीटर अंतरावर खड्डा खोदून कालव्यातून येणारे पाणी बंद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्या ठिकाणी होणार होती. तिथून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कांडी कॅनॉलचा उगम होतो. या कालव्याचे गेट कोणीतरी उघडले होते. त्यानंतर हेलिपॅडकडे पाणी वाहू लागले. दरम्यान होशियारपूर डीसींनी कालवा विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा खरच निष्काळजीपणा होता की जाणून बुजून केले हे चौकशीनंतर स्पष्ट होणार नाही.

कालव्याचे पाणी जाणीवपूर्वक सोडल्याचा आरोप भाजपने केला आहे. पंजाबचे भाजप नेते तिक्षन सूद यांनी आरोप केला की, पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये व्यत्यय आणण्यासाठी कांडी कालव्यातून पाणी मुद्दाम सोडण्यात आले. ही घटना रॅली उधळून लावण्याचा सुनियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंजाबमधील लोकसभेच्या सर्व १३ जागांवर शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे. यावेळी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रवेशामुळे ही लढत रंजक बनली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने १३ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. भाजप आणि अकाली दलाला प्रत्येकी २ जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पक्षाने एक जागा जिंकली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : नक्की कोण जिंकलं? कोण हरलं? भारत-पाक सामन्यावरून राज ठाकरेंचे फटकारे, नवं व्यंगचित्र केलं शेअर....

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, बीडमधील प्रकार

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT