old vehicles pollution india
old vehicles pollution india 
देश

Breaking:केंद्र सरकारची ग्रीन टॅक्सला मंजुरी; जुन्या गाड्यांवर भुर्दंड

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी 8 वर्षे जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लागू करण्याची मंजुरी दिल्याचं सांगितलं आहे. 8 वर्षे जुन्या वाहनांवर फिटनेस सर्टिफिकेटच्या रिन्युअलवेळी टॅक्स वसूल करण्यात येईल. याची गाइडलाइन जारी करण्याआधी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडे याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल असं गडकरींनी सांगितलं. परिवहन मंत्रालयाने सोमवारी याची माहिती देताना सांगितलं की, या करामधून मिळणारा पैसा प्रदुषण नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात येईल.

सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील वाहनांच्या डिरजिस्ट्रेशन आणि स्क्रॅपिंगसाठीच्या प्रस्तावालासुद्धा मंजुरी दिली आहे. 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांसाठी हा नियम असणार आहे. नवे नियम 1 एप्रिल 2022 रोजी जारी केले जातील. गडकरी म्हणाले की, व्यावसायिक वाहने एकूण वाहनांच्या 5 टक्के इतकी आहेत. एकूण वाहनांचा प्रदुषणात 65 ते 70 टक्के वाटा आहे. तर यामध्ये 2000 सालाच्या आधीच्या वाहनांचे प्रमाण 1 टक्के असलं तर प्रदुषण करण्यात यांचे प्रमाण 15 टक्क्यांवर आहे असंही गडकरींनी सांगितलं. 

8 वर्षे जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करताना रोड टॅक्सच्या 10 ते 25 टक्के इतका ग्रीन टॅक्स लावला जाऊ शकतो. खासगी वाहनांवर 15 वर्षानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यू करताना ग्रीन टॅक्स लागू केला जाईल. सार्वजनिक वाहतूक विभागाच्या गाड्यांवर कमी ग्रीन टॅक्स लागू केला जाईल. सरकारने जास्त प्रदूषण असेलल्या शहरांमधील वाहनांसाठी जास्त टॅक्स लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT