groom father and bride mother ran away for the second time at gujrat 
देश

'ते' व्याही-विहीण पुन्हा एकदा पळाले...

वृत्तसंस्था

सूरत (गुजरात): एक महिन्यावर मुला-मुलीचा विवाह आला असताना व्याही-विहीण पळून गेले होते. पंधरा दिवसानंतर ते आलेही होते. पण, पुन्हा एकदा ते पळून गेल्यामुळे दोघांच्या नातेवाईकांना डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली आहे. शिवाय, दोघांच्या प्रेमाविषयी परिसरात चर्चेला उधान आले आहे.

सूरत येथील 43 वर्षीय व्याही आणि नवसारी येथील 42 विहीण प्रथम 10 जानेवारीला बेपत्ता झाले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी ते आले होते. पण, महिलेला तिच्या कुटुंबियांनी घरामध्ये घेण्यास नकार दिला होता. प्रकरण अखेर पोलिसांकडे गेले होते. यानंतर महिला वडिलांच्या घरी गेली होती. पण, पुन्हा एकदा ते पळून गेले असून, चर्चाला उधान आले आहे. यावेळी मात्र दोघांच्याही कुटुंबियांनी तक्रार दाखल केलेली नाही.

दरम्यान, नवरदेवाचे वडील आणि नवरीची आई पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. दोघांचे तरुणपणी एकमेकांवर प्रेम होते. परंतु, दोघांचा विवाह होऊ शकला नव्हता. दोघांनी एकमेकांच्या मुलांचा विवाह निश्चित केला. परंतु, अनेक वर्षांनी पुन्हा एकमेकांच्या जवळ आल्यामुळे दोघांमधील प्रेम पुन्हा वाढले. विवाहास एक महिना असतानाच दोघे पळून गेले होते. पण, विवाहापूर्वीच विहीण आणि व्याह्याने धूम ठोकल्याने मुलांचा विवाह मोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

Ajit Pawar: बारामती वैद्यकीय रुग्णालयास अजित पवार यांचे नाव; राज्य शासनाने घेतला निर्णय

Video : 'असा' झाला शुभविवाह मालिकेचा शेवट ! अभिनेत्रीने शेअर केले Behind The Scene

SCROLL FOR NEXT