Minister Lakshmi Hebbalkar Gruhalakshmi Scheme esakal
देश

Good News : आता घरातील प्रमुख महिलेला मिळणार महिन्याला दोन हजार रुपये; गृहलक्ष्मी योजनेची 'या' तारखेपासून सुरुवात

गृहलक्ष्मी योजनेचा वार्षिक खर्च ३० हजार कोटी असेल, असा अंदाज आहे.

सकाळ डिजिटल टीम

चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १७ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे.

बंगळूर : ‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत (Gruha Lakshmi Scheme) प्रत्येक घरातील प्रमुख महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना लवकरच कार्यान्वीत होईल, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी सांगितले.

आर्थिक सहाय्य योजनेचे अॅप तीन ते चार दिवसांत प्रसिद्ध केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेत सदस्या हेमलता यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले की, दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन अर्ज कोणत्या तारखेपासून सादर करायचा याची माहिती देणार आहे.

चार ते पाच दिवसांत अॅप प्रसिद्ध होईल. १६ ते १७ ऑगस्टपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील. आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून उद्घाटनाची तारीख निश्चित करू. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे.

गृहलक्ष्मी योजनेचा वार्षिक खर्च ३० हजार कोटी असेल, असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १७ हजार ५०० कोटींची तरतूद केली आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासन दिले होते, त्यानुसार आम्ही काम करणार आहोत. याबाबत कोणीही शंका घेऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.

दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना स्वाभिमानाने आणि शांतीचे जीवन जगण्यासाठी सरकारकडून ही छोटीशी मदत आहे. आपल्या सरकारच्या पाच हमी योजनांपैकी गृहलक्ष्मी योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी १०९ हेल्पलाइनवर माहिती शेअर केली आहे. त्याची पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: बंडखोर टीएमसी नेत्यांनी घेतली केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT