GST Council Meeting esakal
देश

GST Council Meet: 1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के GST होणार लागू

Sandip Kapde

GST Council Meet: GST कौन्सिलच्या 51 व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ऑनलाइन गेमिंग आणि हॉर्स रेसिंगवरील 28% जीएसटीचा पुढील सहा महिन्यांत आढावा घेतला जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रामुख्याने ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग आणि कॅसिनोवरील 28 टक्के जीएसटीवर चर्चा करण्यात आली. मागील बैठकीत ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला सातत्याने विरोध होत होता. (GST Council Meet)

मात्र आजच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंगचे दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या 51 व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली, गोवा आणि सिक्कीमने ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटीच्या निर्णयाचा आढावा घेण्याची मागणी केली. ऑनलाइन गेमिंगवर लावलेल्या बेट्सच्या पूर्ण दर्शनी मूल्यावर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय 1 ऑक्टोबरपासून लागू केला जाईल. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT