gst
gst esakal
देश

GST संकलनामुळे सरकारची तिजोरी भरली; PM मोदी झाले खुश

धनश्री ओतारी

एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत १२ टक्के जास्त आहे. २० एप्रिल २०२३ रोजी एका दिवसात ९.८ लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात ६८,२२८ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. काल संपलेल्या एप्रिलमध्ये तब्बल एक कोटी 87 लाख कोटी रुपयाचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे. (GST revenue collection for April 2023 at all time high of Rs 1 87 lakh crore )

आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एकूण १,८७,०३५ कोटींच्या जीएसटी संकलनात CGST संकलन ३८,४४० कोटी रुपये, SGST संकलन ४७,४१२ कोटी रुपये, IGST ८९,१५८ कोटी रुपये आणि उपकर म्हणून १२,०२५ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. मार्च २०२३ मध्ये देशातील जीएसटी संकलन १,६०,१२२ कोटी रुपये होते.

गेल्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी संकलन १,६७,५४० कोटी रुपये होते. म्हणजेच गेल्या एप्रिलच्या तुलनेत या एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात १९,४९५ कोटी रुपये अधिक जमा झाले आहेत.

एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत १२ टक्के जास्त आहे. २० एप्रिल २०२३ रोजी एका दिवसात ९.८ लाख व्यवहार झाले, ज्यामध्ये एका दिवसात ६८,२२८ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यापूर्वी एका दिवसात व्यवहाराचा विक्रम गेल्या वर्षी २० एप्रिल २०२२ रोजी होता, जेव्हा एका दिवसात ९.६ लाख व्यवहार झाले होते, ज्यामध्ये ५७,८४६ कोटी जीएसटी वसुली दिसली होती. अशी माहिती वित्त मंत्रालयाने सांगितली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT